Chanakya Niti Tips : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति मध्ये सुखी आयुष्याचे मूलमंत्र सांगितले आहे. चाणक्य नीति मध्ये सांगितल्याप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीचे आचरण राहिले तर तो त्याच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. चाणक्य नीति मध्ये सुखी संसारासाठी पत्नीने कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या संदर्भात देखील मोठी माहिती दिली गेली आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.
अनेक विवाहित महिला त्यांच्या पतीला टोचून बोलत असतात म्हणजेच टोमणे मारत असतात. मात्र असे केल्याने ती महिला स्वतःच्याच पायावर दगड मारते. कारण की पतीला टोचून बोलल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होतो आणि त्यामुळे पती आणि पत्नीच्या नात्यात दुरावा तयार होण्याची भीती असते. यामुळे महिलांनी कधीच त्यांच्या पतीला टोचून बोलले नाही पाहिजे.
तसेच काही महिलांना स्वयंपाक बनवताना जास्त पीठ मळण्याची सवय असते. मात्र चाणक्य नीति मध्ये जास्त पीठ मळले गेलेले असेल आणि ते पीठ नंतर उपयोगात आणले गेले तर यामुळे सदर कुटुंबातील सुख, शांती, समृद्धी आणि धन ऱ्हास होतो असे म्हटले गेले आहे. यामुळे ज्या महिलांना अशी सवय असेल त्यांनी ताबडतोब ही सवय सोडली पाहिजे.
जी महिला सकाळी उशिरा उठत असेल त्या महिलेच्या पतीची प्रगती होणे अशक्य आहे. खरेतर महिला असो की पुरुष सकाळी उशिरापर्यंत झोपणे चुकीचे आहे. यामुळे सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय मोडली पाहिजे. जे सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांच्या आयुष्यात आळस पाहायला मिळतो. असे लोक कोणतेच काम मोठ्या उत्साहाने करू शकत नाहीत. यामुळे असे लोक त्यांच्याकडे यशस्वी होण्याचे सर्व गुण असतानाही यशस्वी होतात. चाणक्य नीति मध्ये देखील सकाळी उशिरापर्यंत झोपणे चुकीचे असल्याचे म्हटले गेले आहे.
अनेक महिला त्यांच्या पतीला न विचारता काही गोष्टी करतात. मात्र असे केल्याने पती-पत्नींमध्ये कटूता निर्माण होते. संसारात महिलेने कोणतीही गोष्ट करण्या अगोदर पतीसोबत चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला पाहिजे.
याशिवाय चाणक्य नीति मध्ये पत्नीने सतत आपल्या पतीवर संशय घेऊ नये असाही सल्ला दिला आहे. सतत पतीवर संशय घेतल्याने याचा कामावर परिणाम होतो आणि यामुळे साहजिकच पतीच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे पतीवर नेहमीच संशय घेणे टाळले पाहिजे.