Cheapest Car Loan : तुमचा निकटच्या भविष्यात कार खरेदी करण्याचा प्लॅन आहे का ? अहो मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. आज आप सर्वात स्वस्त कार लोन ऑफर करणाऱ्या टॉप पाच बँकांची माहिती पाहणार आहोत. खरंतर, नवीन कार खरेदी करण्यासाठी अनेकजण एकदाच गाडीची संपूर्ण रक्कम देण्यापेक्षा डाऊन पेमेंट करून ईएमआयवर कार खरेदी करतात.
जर तुम्हीही ईएमआयवर कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. अलीकडे देशातील अनेक बँका स्वस्त व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहेत. मात्र कार लोन देताना बँकांकडून प्रोसेसिंग फी वसूल केली जाते.
प्रत्येक बँकेची प्रोसेसिंग फि वेगवेगळी असते. यामुळे आज आपण सर्वात स्वस्त कार लोन ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडतात जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
सर्वात स्वस्त कार लोन देणाऱ्या बँका खालील प्रमाणे
युनियन बँक ऑफ इंडिया : ही बँक 8.70 ते 10.45 या रेटने कार लोन मंजूर करत आहे. ही देशातील एक नामांकित सरकारी बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक कार लोन साठी 1000 रुपये प्रोसेसिंग फी वसूल करते.
पंजाब नॅशनल बँक : ही देखील सार्वजनिक क्षेत्रातील एक नामांकित बँक आहे. ही बँक ८.७५% ते 10.60% रेटने कार लोन देते. कार लोन साठी ही बँक 0.25 टक्के एवढी प्रोसेसिंग फि वसूल करते. म्हणजेच सरासरी हजार ते पंधराशे रुपये एवढी प्रोसेसिंग फि बँकेकडून वसूल केली जाते.
बँक ऑफ बडोदा : सरकारी क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. ही बँक ८.९०% ते 12.70% इंटरेस्ट रेट ने कार लोन देते. यासाठी बँकेकडून दोन हजार रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फी वसूल केली जाते.
कॅनडा बँक : ही देखील बँक 8.70% ते 12.70% या इंटरेस्ट रेटने कार लोन देते. यासाठी 0.25 % प्रोसेसिंग फि द्यावी लागते. सरासरी दोन हजार 500 रुपयांपर्यंत हे शुल्क असू शकते.
बँक ऑफ इंडिया : मिळालेल्या माहितीनुसार, 8.85% ते 10.85% या इंटरेस्ट रेटने बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कार लोन उपलब्ध करून देते. यासाठी बँकेकडून एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतचे प्रक्रिया शुल्क वसूल केले जाते. हे प्रक्रिया शुल्क कर्जाच्या 0.25 टक्के एवढे असू शकते.