Cheapest Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन नेहमीच चर्चेत असते. ही ट्रेन जेव्हापासून लॉन्च झाली आहे तेव्हापासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. ही देशातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात पाच वर्षांपूर्वी अर्थातच 2019 मध्ये झाली. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या महत्त्वाच्या मार्गावर चालवली गेली.

यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. विशेष बाब अशी की यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच राज्याला आठ वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे.

Advertisement

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे त्या गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.

तथापि अनेकांच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत खूपच अधिक असल्याचा आरोप केला जातो. यामुळे ही गाडी फक्त उच्च वर्गीय लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे का? अशी तक्रारही प्रवाशांच्या माध्यमातून केली जाते.

Advertisement

मात्र, देशात सुरू असणाऱ्या 51 वंदे भारत एक्सप्रेस पैकी 5 वंदे भारत एक्सप्रेस अशा आहेत की ज्यातुन प्रवाशांना 1000 रुपयांच्या तिकीट दरात प्रवास करता येतो. दरम्यान, आज आपण 1,000 रुपयाच्या आसपास तिकीट असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई CSMT ते साईनगर शिर्डी : या वंदे भारत एक्सप्रेस मुळे मुंबई ते शिर्डी हे 340 किलोमीटरचे अंतर पाच तास आणि दहा मिनिटांच्या कालावधीत पूर्ण होते. या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ने 1095 ते 2,405 रुपयाच्या तिकीटात प्रवाशांना प्रवास करता येतो.

Advertisement

न्यू जलपाईगुडी जंक्शन-गुवाहाटी : या मार्गावर सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकिटाची किंमत 1075 – 2,025 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. या दोन्ही शहरा दरम्यानचे अंतर 407 किलोमीटर एवढे आहे.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर : मुंबई सेंट्रल ते गांधीनगर हे 520 किमीचे आंतर ही गाडी अवघ्या साडेसहा तासांच्या कालावधीत पार करते. या ट्रेनमुळे मुंबई ते गांधीनगर हा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. या गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 755 रुपयांपासून ते 1955 पर्यंतचे तिकीट काढावे लागते.

Advertisement

डेहराडून ते आनंदविहार टर्मिनल : या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 302 किलोमीटरचे अंतर पावणे पाच तासात पूर्ण करते. या ट्रेनमुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास खूपच वेगवान झाला आहे. या ट्रेनच्या तिकिटाची किंमत ही 1 हजार 65 रुपये ते 2485 रुपये एवढी आहे.

हावडा ते पुरी : हावडा ते पूरीदरम्यान सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी तिकिटाची किंमत ही 1065 – 2,485 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. हावडा ते पुरी हे अंतर 500 किलोमीटरचे आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *