Cibil Score Check : तुम्हीही बँकेतून कधी कर्ज काढलय का ? हो, तर मग तुम्हाला सिबिल स्कोर विषयी माहितीच असेल. खरंतर, आपल्याला जेव्हाही पैशांची गरज उद्भवते तेव्हा आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. बँकेकडून ग्राहकांना, गोल्ड लोन, होम लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, प्रॉपर्टी लोन असे वेगवेगळे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
मात्र, कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम बँकांच्या माध्यमातून सिबिल स्कोर चेक केला जातो. ज्याचा सिबिल स्कोर चांगला असतो त्याला सहजतेने कर्ज मंजूर होते.
अशा व्यक्तीला कमी व्याजदरात कर्ज मिळते. विशेष म्हणजे कर्जाची रक्कम देखील वाढते. परंतु जर सिबिल स्कोर कमी असेल तर कर्ज मिळवण्यात अडचणी येतात.
अनेकदा बँका अशा लोकांना अधिकच्या व्याजदरात कर्ज देतात. यामुळे सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक असते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान असतो.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो अशा लोकांना सहजतेने कर्ज मिळते. म्हणजेच 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर चांगला मानला जातो. अशा लोकांना कमी व्याज दरात कर्ज मिळते.
दरम्यान अनेकांच्या माध्यमातून जर सातत्याने सिबिल स्कोर चेक करत राहिले तर सिबिल स्कोर डाऊन होतो का हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Cibil Score खरच डाउन होतो का ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार CIBIL स्कोर अथवा क्रेडिट स्कोर हा ग्राहकाच्या मागील कर्जाच्या इतिहासाचा एक अहवाल असतो. हा स्कोर बँकेला कर्ज केव्हा घेतले गेले आणि कर्जाबाबत चौकशी केव्हा केली गेली हे सांगत असतो.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सातत्याने सिबिल स्कोर चेक केल्यानंतर स्कोर कमी होतो का? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर तुम्ही स्वतः CIBIL स्कोर तपासत असाल, तर तुमच्या CIBIL स्कोअरमध्ये कोणताही फरक पडणार नाही.
याशिवाय तुम्ही कर्जासाठी अर्ज केल्यास कर्ज देणारी कंपनी तुमचा सिबिल स्कोअर तपासते, जेव्हा बँक स्कोर तपासते, तेव्हा तुमचा CIBIL स्कोर खाली जाऊ शकतो.
त्यामुळे अधिक कर्जासाठी चौकशी करू नये. तुम्ही तुमचा CIBIL स्कोर कितीही वेळा तपासू शकता यात कोणतीच अडचण नाही.