Cibil Score Trick : तुम्हीही कधीतरी बँकेकडून कर्ज काढले असेल ? हो ना, मग तुम्हाला सिबिल स्कोरचे महत्व ठाऊकच असेल. खरे तर कर्ज देताना बँका सर्वप्रथम कोणत्याही व्यक्तीचा CIBIL स्कोर तपासतात. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. कर्ज घेताना सिबिल स्कोर हा एक घटक महत्त्वाची भूमिका निभावत असतो.
ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो बँकेच्या माध्यमातून त्यांना अधिकचे कर्ज मंजूर केले जाते. चांगला सिबिल स्कोर असल्यास बँकेकडून कमी व्याजदर घेतले जाते आणि लवकरात लवकर कर्ज मंजूर करण्यासाठी बँका तत्पर पाहायला मिळतात.
दुसरीकडे, जर क्रेडिट स्कोअर खराब असेल तर कर्ज मिळणे खूपच कठीण होऊन बसते. खराब क्रेडिट स्कोरमुळे अनेकांना कर्ज नाकारले जाते. जरी बँकेकडून कर्ज दिले गेले तरी देखील या प्रकरणांमध्ये बँका अधिकचे व्याजदर आकारतात.
दरम्यान आज आपण जर एखाद्याचा सिबिल स्कोर मायनस मध्ये असेल तर तो 750 पेक्षा अधिक कसा बनवायचा, यासाठी कोणती ट्रिक फॉलो केली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सिबिल स्कोर मायनसमध्ये का जातो ?
ज्यांनी बँकेकडून लोन घेतलेले नसते किंवा जे लोक क्रेडिट कार्डचा वापर करत नाहीत त्यांचा सिबिल स्कोर हा मायनसमध्ये पाहायला मिळतो. याचे कारण म्हणजे त्यांची क्रेडिट हिस्टरी तयार झालेली नसते.
अशा प्रकरणांमध्ये सदर व्यक्तीचा क्रेडिट स्कोर हा -1 वर जातो. दरम्यान आता आपण मायनस Cibil 750 पेक्षा अधिक कसा बनवायचा हे थोडक्यात पाहणार आहोत.
मायनस सिबिल स्कोअर कसा सुधारणार ?
मायनस सिबिल स्कोअर वाढवण्याचे दोन सर्वोत्तम मार्ग आहेत, तुम्ही दोनपैकी एक पद्धत वापरून पाहू शकता. पहिला मार्ग म्हणजे जर तुम्ही बँकेत प्रत्येकी 10,000 रुपयांच्या दोन छोट्या एफडी केल्या.
एफडी उघडल्यानंतर त्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत कर्ज घ्या. तुम्ही कर्ज घेताच तुमचे कर्ज सुरू होईल. कर्जाची रक्कम निर्धारित वेळेत परत करा.
यामुळे तुमचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड सुधारेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर झपाट्याने वाढेल. दुसरा सोपा मार्ग म्हणजे बँकेकडून क्रेडिट कार्ड घेणे आणि त्याचा वापर करून खरेदी करणे. क्रेडिट कार्डवर खर्च होणारी रक्कमही एक प्रकारचे कर्जच असते.
तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करताच तुमचे कर्ज सुरू होईल. कर्ज म्हणून खर्च केलेली ही रक्कम तुम्ही वेळेवर परत करावी. नंतर मग तुमचा CIBIL स्कोअर काही दिवसात अपडेट केला जाईल.