Cibil Score : तुम्हीही कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. आपल्यापैकी अनेकांनी कुठले ना कुठले कर्ज घेतलेले असेलच. किंवा नजिकच्या भविष्यात होम लोन, कार लोन, पर्सनल लोन घेण्याचा प्लॅन असेल.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोणत्याही प्रकारचे लोन घेण्यासाठी बँका सर्वप्रथम सिबिल स्कोर तपासतात. खरेतर, उच्च क्रेडिट स्कोअर हे सूचित करते की तुम्ही तुमचे कर्ज EMI आणि क्रेडिट बिले वेळेवर भरता.
यामुळे ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकांच्या माध्यमातून लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते. तसेच चांगला सिबिल स्कोर असलेल्यांना कमी व्याज दरात कर्ज मिळते.
जर चांगला सिबिल स्कोर असेल तर बँक असे समजते की, तुम्ही घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड कराल आणि बँकेचे पैसे बुडणार नाहीत. त्यामुळे सिबिल स्कोर चांगला राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
सिबिल स्कोर म्हणजे काय रे भाऊ ?
आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की सिबिल स्कोर म्हणजे काय ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सिबिल स्कोअर हा तुमचा क्रेडिट इतिहास, रेटिंग आणि अहवालावर आधारित एक तीन-अंकी क्रमांक असतो.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. जसजसा तुमचा हा स्कोअर 900 च्या जवळ जातो, तुमचे क्रेडिट रेटिंग सुधारते. सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असेल तर असा सिबिल स्कोर चांगला मानला जातो. याच सिबिल स्कोरच्या आधारावर बँका कर्ज द्यायचे की नाही हे ठरवत असतात.
ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना कमी व्याज दरात आणि अधिक कर्ज मंजूर होते. चांगला सिबिल स्कोर डेव्हलप होण्यासाठी किमान 18 महिने ते 36 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
कार लोन घेण्यासाठी किती सिबिल स्कोर असायला हवा ?
कार लोनसाठी सिबिल स्कोर किती असायला हवा ? असा प्रश्न काही लोकांच्या माध्यमातून उपस्थित होत होता. जाणकार लोकांच्या मते, कार लोन घेण्यासाठी किती Cibil असावा याचा काही नियम तयार झालेला नाही.
परंतु बँकांच्या माध्यमातून किमान 700 सिबिल स्कोर असलेल्या लोकांना कर्ज देताना प्राथमिकता दाखवली जाते. जर 700 पेक्षा कमी सिबिल स्कोर असेल तरी देखील बँका कर्ज देऊ शकतात. पण यासाठी अधिकचे व्याजदर आकारले जाऊ शकते.
तसेच कर्ज मंजूर करताना फक्त सिबिल स्कोरच विचारात घेतला जात नाही तर यासोबत तुमचा पगार, सध्याचे कर्ज, नोकरीची स्थिरता आणि डाउन पेमेंट यासारख्या इतर अनेक घटकांचा देखील बँकेकडून विचार केला जातो.