Cidco Home : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. प्रामुख्याने मुंबई आणि नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती अधिक वाढल्या आहेत. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घर घेणे अलीकडे मुश्किल बनले आहे.
यामुळे या शहरांमध्ये घर घेऊ इच्छिणारे सर्वसामान्य म्हाडा आणि सिडकोच्या घराची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे सिडको नवी मुंबईत 3322 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज 30 जानेवारी 2024 पासून 3322 घरांसाठी अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
इच्छुक उमेदवारांना या सोडतीसाठी 27 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामुळे नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना परवडणाऱ्या दरात आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
सोडती मध्ये कोणत्या भागातील घरांचा समावेश राहणार
सिडको कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या सोडतीमध्ये द्रोणागिरी आणि तळोजा येथील 3,322 घरांचा समावेश राहणार आहे.
या घरांसाठी आजपासून अर्थातच 30 जानेवारी 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून ही अर्ज प्रक्रिया 27 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.
खरे तर द्रोनागिरी परिसरात घरांच्या किमती गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे या परिसरातील घरांना मोठी मागणी आली आहे.
या प्रकल्पामुळे द्रोणागिरी व आजूबाजूच्या परिसरात घर खरेदीचा आलेख वाढू लागला आहे. जर तुम्हालाही द्रोनागिरी मध्ये घर हवे असेल तर सिडकोची ही लॉटरी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
घरांच्या किमती किती राहणार ?
सिडकोच्या या लॉटरीत समाविष्ट असलेल्या द्रोनागिरी येथील घरांच्या किमती 22 लाखांपासून ते 30 लाखांपर्यंत राहणार आहेत.
यात आर्थिक दुर्बल घटकासाठी २५.८१ चौरस मीटरची सदनिका २२ लाख १८ हजार रुपयांमध्ये तसेच २९.८२ चौरस मीटरची सदनिका सर्वसाधारण प्रवर्गामधील लाभार्थ्यांना ३० लाख १७ हजारांना मिळणार आहे. दुसरीकडे तळोजा येथील घरांच्या किमती 22 लाख ते 34 लाख दरम्यान राहणार आहेत.