Maharashtra Railway : उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध महानगरांमध्ये स्थायिक झालेली पब्लिक आपल्या मूळ गावाकडे परतत असते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लग्न सराई देखील असते.
यामुळे अनेक जण लग्नासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतात. यंदा देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की, यावर्षी लोकसभेची निवडणूक देखील सुरू आहे यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी परतणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
हेच कारण आहे की रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून काही विशेष एक्सप्रेस ट्रेन देखील चालवल्या जात आहेत. या विशेष गाड्यांमुळे मात्र प्रवाशांचा प्रवास हा वेगवान झाला आहे.
अशातच राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अहमदाबाद ते पुरी दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही समर स्पेशल ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.
ही ट्रेन राज्यातील खानदेश आणि विदर्भ विभागातील सात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात रेल्वे प्रशासनाने दिलेल्या महत्त्वपूर्ण अशा माहिती विषयी जाणून घेणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद-पुरी विशेष एक्सप्रेस ट्रेन दहा मेला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
तसेच पुरी-अहमदाबाद ही समर स्पेशल ट्रेन 12 मे ला दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी पुरी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. यामुळे अहमदाबाद ते पुरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
हाती आलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी राज्यातील नंदुरबार, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, वर्धा, नागपूर, तुमसर रोड, गोंदिया या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
त्यामुळे विदर्भ आणि खानदेशातील या संबंधित रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.