Courses After 12th : आज 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाची आतुरता होती. आता मात्र बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार असून आज बारावीचा रिझल्ट लागणार आहे.
दरम्यान, आज आपण महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याने बारावीनंतर कोणते कोर्स केले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. बारावीनंतर केले जाणारे डिप्लोमा कोर्स संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
बारावी सायन्स नंतर कोणते डिप्लोमा कोर्सेस करता येतात
डिप्लोमा इन कंप्यूटर इंजीनियरिंग / कम्प्युटर एप्लीकेशन : या डिप्लोमा कोर्ससाठी बारावीनंतर ऍडमिशन घेता येते. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्र, मॅथ किंवा बायोलॉजी या तीन विषयांसह बारावी सायन्स केलेले असेल त्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येतो. मात्र यासाठी बारावी सायन्स मध्ये किमान 50 टक्के गुण मिळायला हवे.
डिप्लोमा इन नर्सिंग : फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयासह किमान 50% गुण मिळवलेले विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र ठरतात. यासाठी मात्र एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते.
डिप्लोमा इन फिजिओथेरपी : फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांसह किमान 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र राहतात.
बारावी कॉमर्स नंतर कोणते डिप्लोमा कोर्सेस करता येतात
बँकिंग आणि फायनान्स मध्ये डिप्लोमा : बारावी कॉमर्स नंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हा डिप्लोमा कोर्स करतात. बारावी कॉमर्स केल्यानंतर हा कोर्स करता येतो.
डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड / आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थापन : बारावी कॉमर्स नंतर या कोर्सला प्रवेश घेता येतो. हा एक लोकप्रिय डिप्लोमा कोर्स आहे.
डिप्लोमा इन बिझनेस / बिग डेटा ऍनॅलिटीक्स : किमान 50 टक्के गुणांसह बारावी कॉमर्स उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्ससाठी अर्ज करू शकतात.
बारावी आर्ट नंतर केले जाणारे डिप्लोमा कोर्सेस
डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट : किमान 50% गुणांसह बारावी आर्ट उत्तीर्ण विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.
डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग : यासाठी देखील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतात. कला शाखेतून बारावी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा डिप्लोमा कोर्स फायदेशीर ठरतो.
परदेशी भाषांमध्ये डिप्लोमा : बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र ठरतात. किमान 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र राहणार आहेत.