DA Hike:- केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर प्रामुख्याने महागाई तसेच घरभाडे भत्ता, आठवा वेतन आयोग इत्यादी प्रमुख मागण्या असून यासंदर्भात केंद्र सरकारकडून काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी प्रामुख्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.
यामध्ये जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा विचार केला तर मागच्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये साधारणपणे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली होती व तो 42% वरून 46 टक्क्यांवर नेण्यात आला होता.
परंतु आता लेबर ब्युरो च्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या एआयसीपीआय इंडेक्स अर्थात निर्देशांकाच्या आधारावर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात परत एकदा वाढ होईल अशी अपेक्षा असून यामध्ये मिळालेल्या माहितीचा आधार घेतला तर जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात होणार चार टक्क्यांची वाढ?
जर आपण वाढीव महागाई भत्याचा विचार केला तर तो साधारणपणे जुलैपासून देण्यात आलेला होता व आता यावर्षीची वाढ जानेवारी 2024 पासून होण्याची शक्यता असून आता देण्यात येत असलेल्या 46% महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणार असून या चार टक्के वाढीसह महागाई भत्ता 50% होईल असा दावा अनेक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून केला जात आहे.
तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना या व्यतिरिक्त घर भाडेभत्ता वाढीचा लाभ देखील मिळेल अशी शक्यता आहे. जर महागाई भत्ता व घरभाडे भत्ता या दोन्हींमध्ये वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील लवकरच मोठी वाढ होईल अशी अपेक्षा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे.
सध्या किती मिळत आहे घरभाडे भत्ता व त्याचे स्वरूप?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही घरभाडे भत्याचा लाभ दिला जातो तो तीन श्रेणीमध्ये विभागला जातो व यातील श्रेणी म्हणजे एक्स, वाय आणि झेड अशा प्रकारचे असतात. या श्रेणी प्रामुख्याने शहरांची लोकसंख्या किंवा शहरानुसार ठरवल्या जातात. जे कर्मचारी एक्स श्रेणी शहरात राहतात त्यांना सत्तावीस टक्के,
वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 18 आणि झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घरभाडे भत्ता देण्यात येत आहे. परंतु यामध्ये महागाई भत्त्याचे कनेक्शन असून जर महागाई भत्ता 50% च्या पुढे गेला तर यामध्ये आणखी वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
साधारणपणे जर आपण मिळालेल्या माहितीचा विचार केला तर महागाई भत्ता 50% च्या पुढे गेल्यास घर भाडेभत्यात तीन टक्क्यांची वाढ होईल. जर तीन टक्क्यांची वाढ झाली तर एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीस टक्के, वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 20 टक्के आणि झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढा घर भाडे भत्ता मिळणार असे देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु महागाई भत्ता 50% क्रॉस करणे यासाठी गरजेचे आहे व तेव्हाच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.