आपण जे काही पैसे कमवतो त्या पैशांची बचत आणि बचतीचे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे हे भविष्यकालीन आर्थिक सक्षमता आणि आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, मुला मुलींचे उच्च शिक्षण तसेच लग्नकार्य इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासू शकते.

त्यामुळे आपण कमवलेल्या पैशांची बचत करून त्यांची गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या निर्माण होत नाही व अगदी आरामांमध्ये आपण मुलांचे उच्च शिक्षण असो किंवा लग्नकार्य इत्यादीसाठी पैशांची तजवीज करू शकतो.

Advertisement

यामध्ये जर आपण उच्च शिक्षणाचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो. त्यामुळे मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाल्यानंतर लगेचच पुढील उच्च शिक्षणासाठी चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण असे दोन गुंतवणुकीचे पर्याय पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्ही  महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तरी चक्रवाढ व्याजाचा तुम्हाला फायदा मिळतो व पंधरा वर्षात तुम्ही लाखो रुपये जमा करू शकता.

 मुलांच्या जन्मानंतर उच्च शिक्षणासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणूक

Advertisement

1- पीपीएफ अर्थ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजना ही फायद्याची योजना असून कुठलाही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या योजनेतून एका वर्षात कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकतात.

या योजनेत तुमच्या गुंतवणुकीला सरकारची हमी मिळते व तुम्ही कितीही रक्कम गुंतवत असाल तर त्यावर तुम्हाला हमी परतावा मिळतो. सध्या साधारणपणे या योजनेवर 7.1% व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये या योजनेत गुंतवले तर वर्षात तुम्ही साठ हजार रुपये गुंतवतात.

Advertisement

या योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे व अशा स्थितीत तुम्ही पंधरा वर्षात नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1% दराने व्याज मिळाले तर व्याजाची एकूण रक्कम सात लाख 27 हजार 284 रुपये होते. अशा प्रकारे ही योजना परिपक्व झाल्यानंतर तुम्ही गुंतवलेले नऊ लाख व त्यावर मिळणारे व्याज असे एकूण तुम्हाला 16 लाख 27 हजार 284 रुपये मिळतात. या रकमेचा वापर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी करू शकतात.

2- सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपी तुम्हाला जर तुमच्या गुंतवणुकीवर जोखीम घ्यायची असेल व त्यातून तुम्हाला जास्तीचा परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. मार्केट लिंक्ड योजना असताना त्यामध्ये परताव्याचे हमी नाही.

Advertisement

परंतु जर तुम्ही गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने जर तुम्ही यामध्ये दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक केली तर सरासरी 12 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो. यामध्ये तुम्ही दरमहा पाच हजार रुपये गुंतवले तर सरासरी 12% व्याजदर आणि पंधरा वर्षात नऊ लाख रुपयांचे गुंतवणूक आणि त्यावर 16 लाख 22 हजार 880 रुपये व्याज मिळेल.

अशी एकूण तुमची गुंतवलेली रक्कम आणि मिळणारे व्याज मिळून तुम्हाला पंधरा वर्षात 25 लाख 22 हजार 880 रुपये मिळतील. ही रक्कम देखील तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करू शकतात व त्यांचे उज्वल भविष्य घडवू शकतात.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *