Banking News : आपण सर्वजण बहूकष्टाने कमावलेला पैसा बँकेत सुरक्षित रहावा यासाठी ठेवत असतो. तसेच काहीजण बँकेत एफडी करत असतात. आपल्याला वाटते की बँकेत असलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे आपण सर्वच पैसे बँकेत ठेवत असतो.

पण, जर तुमच्या खात्यात पाच लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचली पाहिजे. कारण की पाच लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम बँक खात्यात असल्यास खातेधारकांना काही नुकसान सहन करावे लागू शकते.

Advertisement

दरम्यान आज आपण पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम बँक खात्यात असल्यास काय नुकसान होऊ शकते याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

5 लाखापेक्षा जास्तीची रक्कम खात्यात असली तर

Advertisement

खरे तर, तुम्ही बँकेत कितीही रक्कम ठेवू शकता. मात्र जर बँक दिवाळखोर झाली तर खातेधारकांचे पैसे बुडू शकतात. मात्र, खातेधारकांचे सर्वच पैसे बुडत नाहीत. खरेतर बँक ग्राहकांच्या हितासाठी 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या नव्याने झालेल्या निर्णयानुसार जर एखादी बँक बुडाली म्हणजे दिवाळखोर झाली तर अशा संकटात सापडलेल्या बँकांच्या ग्राहकांना तीन महिन्यांत म्हणजे ९० दिवसात ठेव विमा दावा मिळतो. जर बँक दिवाळखोर झाली असेल तर DICGC कायद्यानुसार 90 दिवसांच्या आत ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. यासाठी सरकारने ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यात सुधारणा केली आहे.

Advertisement

2020 मध्ये, सरकारने ठेवींवरील विमा संरक्षण 5 लाख रुपये केले होते. आधी ही रक्कम फक्त एक लाख रुपये एवढी होती. आता ही रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जर एखादी बँक दिवाळखोर झाली तर ग्राहकांना त्यांची पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते.

मात्र यापेक्षा अधिकची रक्कम खात्यात जमा असेल तर बँक खातेधारकांना ही रक्कम परत मिळत नाही. यामुळे 5 लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जर खात्यात असेल तर ग्राहकांसाठी ही निश्चितच चिंतेचे बाब राहणार आहे. मात्र क्वचितच एखादी बँक दिवाळखोर होते, यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *