Driving Licence Rule : तुम्हीही नजीकच्या भविष्यात वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या तयारीत आहात का? अहो, मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे सरकारच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. तर सध्या स्थितीला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना किमान दोन आठवड्यांचा वेळ लागत आहे.
कारण की ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सर्वप्रथम आरटीओ कडे अर्ज करावा लागतो यानंतर मग सदर वाहन चालकाची कम्प्युटरवर ऑनलाइन परीक्षा घेतली जाते यानंतर मग वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाते.
सर्व प्रक्रियेमध्ये एका आठवड्यापासून तर दोन आठवडे पर्यंतचा वेळ वाया जातो. काही प्रकरणांमध्ये याहीपेक्षा अधिकचा वेळ लागू शकतो. मात्र नजीकच्या काळात ही सर्व प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण की आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कडे जाण्याची गरज राहणार नाही.
हाती आलेल्या माहितीनुसार आता खाजगी संस्था सुद्धा वाहनचालकांना ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करून देणार आहेत. वाहनचालकाची चाचणी घेण्यासं आणि प्रमाणपत्र देण्यास आता खाजगी संस्थांना परवानगी देण्यात आली आहे.
एक जून 2024 पासून ही परवानगी मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात काही महत्वाचे अन मोठे बदल केले आहेत.
या नव्या नियमानुसार आता खाजगी संस्थांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी चाचण्या घेता येणार आहेत आणि प्रमाणपत्र देता येणार आहे. हा नियम येत्या 1 जूनपासून लागू होणार माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल.
तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25 हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच, ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल. यामुळे भविष्यात ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी होईल. लायसन्स काढण्यासाठी सर्वसामान्यांचा जो वेळ वाया जात आहे तो वेळ यामुळे वाचू शकणार आहे.