Edible Oil Rate Hike : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे बेजार झाले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरातही विक्रमी वाढ झालेली आहे. यामुळे, सर्वसामान्य जनता भरडली जात असून हाताशी येणारा पैसा घर खर्चातच निघून जात आहे.
परिणामी सर्वसामान्य जनतेच्या मनात सरकार विरोधात आता तीव्र असंतोषाची भावना पाहायला मिळत आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातोय. अशातच, खाद्यतेलाच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
ती म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थातच 2023 च्या तुलनेत या चालू वर्षात अर्थातच 2024 मध्ये खाद्यतेलाच्या विक्रीत घट आली आहे. यावर्षी तब्बल 12 ते 15 टक्क्यांनी खाद्यतेलाची विक्री कमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण भारतात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
खाद्यतेलाची विक्री कमी झाली असल्याने खाद्यतेलाचे भाव देखील कमी होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही बाजारात खाद्य तेलाचे भाव चढेच आहेत. यामुळे आगामी काळात खाद्य तेलाचे भाव कमी होणार की असेच कायम राहणार असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.
दरम्यान या संदर्भात बाजार अभ्यासकांनी मोठी माहिती दिली आहे. खरंतर पुढल्या महिन्यापासून खाद्य तेलाची मागणी वाढणार अशी शक्यता आहे. फेस्टिव सीझनमध्ये अर्थातच सणासुदीच्या काळात दरवर्षी खाद्य तेलाची मागणी वाढते. पुढील महिन्यात अर्थातच ऑगस्ट महिन्यात फेस्टिव सीजनला सुरुवात होणार आहे.
गौरी गणपती, पोळा, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी असे अनेक सण येत्या काही दिवसांनी असतील. या सणासुदीच्या काळात साहजिकच खाद्यतेलाच्या मागणीत वाढ होणार आहे. यामुळे सध्या बाजारात खाद्यतेलाला मागणी कमी असली तरी देखील भाव कमी होणार नाही अशी माहिती तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
याउलट फेस्टिव सीझनमध्ये म्हणजेच पुढील महिन्यापासून खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते असा अंदाज बाजारातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारात सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन आणि तीळ असे सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती कडाडलेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बाजारात सध्या स्थितीला सोयाबीन तेल १०३ रुपये लिटर, सनफ्लावर ११० रुपये लिटर, शेंगदाणा तेल १६० ते २०० रुपये लिटर, मोहरीचे तेल १४५ रुपये लिटर तर तिळीचे तेल २२० रुपये लिटर या दरात विकले जात आहे.
विशेष म्हणजे पुढील महिन्यापासून या भावात आणखी वाढ होणार आहे. म्हणून सर्वसामान्य गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार असे बोलले जात आहे.