Edible Oil Rate Will Hike : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. इंधनाच्या आणि खाद्य तेलाच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये खूपच वाढल्या आहेत. दरम्यान पुढील महिन्यात अर्थातच ऑगस्ट महिन्यात सर्वसामान्यांचे बजेट आणखी कोलमडणार असे चित्र तयार होत आहे.

कारण की ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Advertisement

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलाच्या विक्रीमध्ये मोठी घट नमूद करण्यात आली आहे. यावर्षी खाद्यतेलाच्या विक्रीत जवळपास 12 ते 15 टक्क्यांची घट आली आहे. मात्र असे असले तरी खाद्यतेलाच्या किमती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत.

उलटपक्षी आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढणार आहेत. पुढील ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत प्रतिलिटर दोन ते तीन रुपयांची वाढ होणार असा दावा आता बाजार अभ्यासकांनी केला आहे.

Advertisement

विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांचा विचार केला असता यंदा म्हणजेच 2024 मध्ये खाद्यतेलाच्या विक्रीमध्ये मोठी घट आली आहे. विक्रीत घट आली असल्याने खाद्यतेलाच्या किमती कमी होणे अपेक्षित होते. मात्र खाद्यतेलाचा बाजार हा बाजाराच्या समीकरणाच्या विपरीत वागत आहे.

कारण की विक्रीमध्ये घट आलेली असतानाही खाद्यतेलाच्या किमतीत अपेक्षित घट आलेली नाही. याउलट पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या किमती प्रतिलिटर दोन ते तीन रुपयांनी वाढणार आहेत.

Advertisement

विक्रेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढल्या महिन्यापासून म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून फेस्टिव सिझन सुरू होणार आहे. दरवर्षी फेस्टिव सिझनमध्ये खाद्यतेलाला मोठी मागणी येत असते. कितीही मंदी असली तरी देखील सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या विक्रीचा ग्राफ वाढतो.

यंदा देखील तशीच परिस्थिती तयार होणार असून पुढील महिन्यात खाद्यतेलाच्या विक्रीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढल्या महिन्यात गौरी गणपती आणि रक्षाबंधनासारखे मोठे सण येणार असल्याने या काळात खाद्यतेलाच्या किमती आणखी कडाडणार आहेत. 

Advertisement

खाद्यतेलाचे सध्याचे भाव कसे आहेत ?

सोयाबीन : १०३ रुपये लिटर

Advertisement

सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल : ११० रुपये लिटर

शेंगदाणा तेल : १६० ते २०० रुपये लिटर

Advertisement

मोहरीचे तेल  : १४५ रुपये लिटर 

तिळीचे तेल : २२० रुपये लिटर 

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *