FD Interest Rate : जर तुम्ही ही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची राहणार आहे. खरे तर एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणूकदारांमध्ये एक चांगला पर्याय समजला जातो. येथे गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देखील मिळतो.
विशेष म्हणजे येथील गुंतवणूकही पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे अलीकडे एफडी करण्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. महिला देखील मोठ्या प्रमाणात एफडी मध्ये गुंतवणूक करत आहेत.
मात्र एफडी मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर सरकारकडून टॅक्स वसूल केला जातो. कदाचित तुम्हाला याबाबत माहिती नसेल मात्र एफडी मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर एक ठराविक रक्कम टॅक्स म्हणून भरावी लागते. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
एफडी वर किती टॅक्स द्यावा लागतो ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, FD वर दरवर्षी जे काही व्याज मिळते ते सदर व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाते. जर सदर व्यक्तीचे एकूण उत्पन्न एफडी मधून प्राप्त झालेले उत्पन्न जोडून कराच्या कक्षेत येत असेल तर त्याला स्लॅबनुसार, या ठिकाणी आयकर भरावा लागणार आहे.
आयटीआर भरताना, एफडी व्याजातून मिळणारे हे उत्पन्न इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जाते.
एफडीवर टीडीएस कापण्याचेही नियम आहेत. जर तुम्ही एका वर्षात FD व्याजातून रु. 40,000 पेक्षा जास्त कमावले असल्यास, बँक खात्यात व्याज जमा करण्यापूर्वीच तुमच्याकडून 10 टक्के TDS कापला जातो.
तथापि, तुम्ही एका वर्षात FD मधून 40,000 रुपयांपर्यंत कमावल्यास, TDS कापला जाणार नाही. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी FD मधून वर्षभरात ५० हजार रुपयांपर्यंतच्या कमाईवर TDS लावला जात नाही.
अशा परिस्थितीत एफडीच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांच्या एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्स द्यावा लागत नाही. 5 वर्षांची FD टॅक्स सेव्हिंग FD म्हणून ओळखली जाते.
5 वर्षाच्या FD मध्ये तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C चा लाभ मिळतो. कलम 80C अंतर्गत, तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नातून 1.5 लाख रुपयांच्या कपातीचा दावा करू शकता.
प्रत्येक आर्थिक वर्षात 1,50,000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त असते. परंतु जर तुम्ही तुमची एफडी 5 वर्षापूर्वी मोडली तर बँक तुमच्याकडून दंड आकारते. तसेच पाच वर्षांची एफडी मध्येच ब्रेक केल्यास कर बचत लाभ देखील मिळत नाही.