FD Interest Rate : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. यामध्ये फार पूर्वीपासून लोकप्रिय असलेला FD चा ऑप्शन देखील आहे. खरंतर अनेक जण अधिकचा परतावा मिळावा यासाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात.
मात्र असे असले तरी आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी करण्यालाच विशेष महत्त्व दाखवले जाते. दरम्यान जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल आणि नजीकच्या भविष्यात मोठा पैसा बँकेत गुंतवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील दुसऱ्या सर्वाधिक मोठ्या बँकेने एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे.
काल, अर्थातच 17 फेब्रुवारी 2024 ला आयसीआयसीआय बँकेने आपल्या काही कालावधीच्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतचे एफडीचे व्याजदर सुधारित केले आहेत.
खरे तर बँकेकडून काही लिमिटेड पीरियडमधील एफडीचे सुधारित केले गेले आहेत. बँकेने 15 महिन्यांपासून ते दोन वर्ष कालावधीच्या एफडीचे व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता या कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.20% आणि ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 7.75% एवढे व्याज ऑफर केले जाणार आहे. पण, यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना किमान दहा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
अर्थातच किमान दहा हजार रुपयांपासून ते कमाल दोन कोटी रुपयांपर्यंतच्या आणि पंधरा महिने ते दोन वर्षे कालावधीच्या एफडी करिता आयसीआयसीआय बँकेकडून आता 7.20 ते 7.75% पर्यंतचे व्याजदर दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे सुधारित करण्यात आलेले हे नवीन व्याजदर कालपासून तात्याचं 17 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.
अर्थातच आता आयसीआयसीआय या प्रायव्हेट सेक्टर मध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेत एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळणार आहे. विशेषतः या बँकेत ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केल्यास त्यांना अधिकचे व्याज मिळू शकणार आहे.