FD Interest Rate : भारतात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेचा देखील समावेश होतो. मुदत ठेव योजना ही गुंतवणुकीची सर्वात लोकप्रिय योजना आहे.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे देशातील विविध बँकांनी एफडीचे व्याजदर गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.
याचा परिणाम म्हणून एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू लागला आहे. अशातच आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एफडीचे व्याजदर पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता या बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा मिळू शकणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD साठीचे व्याजदर वाढवले आहे.
आता ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या एफडी साठी 3.5% ते सात टक्क्यांपर्यंतचे व्याजदर मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचे व्याजदर मिळू शकणार आहे.
म्हणजेचं ज्येष्ठ नागरिकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या एफडी साठी चार टक्के ते 7.50% एवढे व्याज मिळणार आहे.
केव्हापासून लागू होणार नवीन दर
बँकेने सांगितल्याप्रमाणे एफ डी चे हे नवीन दर 10 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत. बँकेने दोन वर्षांपासून ते तीन वर्ष कालावधीपर्यंतच्या FD साठी नवीन व्याजदर लागू केलेले आहे. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याजदरचा लाभ मिळणार आहे.
कसे आहेत नवीन दर
बँकेने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना ७ ते १४ दिवसांच्या एफडीवर ३.७५ टक्के व्याज दिले जाणार आहे. १५ दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.७५ टक्के व्याज दिले जाणार आहे. ४६ दिवसांच्या एफडीवर ४.५० टक्के व्याज मिळेल.
60 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के पर्यंत व्याज मिळणार आहे. 91 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के पर्यंत व्याज मिळणार आहे. 180 ते 270 दिवसांच्या FD वर 6 टक्के व्याज मिळणार आहे. 271 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के पर्यंत व्याज मिळणार आहे.