FD News : भारतात FD अर्थातच फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. अलीकडे तर ही संख्या अधिक वाढली आहे. याचे कारण म्हणजे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना खूपच चांगला परतावा मिळत आहे. अलीकडे विविध बँकांनी एफडी वरील व्याजदर वाढवले आहे. यामुळे, अनेकांनी आता एफ डी मध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे.
महिला वर्ग देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. आधी महिला मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करत असत मात्र आता त्यांचा देखील माईंडसेट बदलला आहे. FD मधून चांगला पैसा मिळत असल्याने महिला येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.
विशेष म्हणजे जाणकार लोकांनी सध्याचा काळ हा एफडी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. मात्र जे लोक एफडी मध्ये गुंतवणूक करणार आहेत त्यांच्या माध्यमातून एफडी मध्ये गुंतवलेली रक्कम किती वर्षांनी दुप्पट होणार हे कसे चेक करायचे? विचारणा केली जात होती.
दरम्यान आज आपण एफडी मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर दोन लाख रुपये होण्यास किती वर्षांचा काळ लागू शकतो? हे चेक करण्यासाठी कोणत्या फॉर्मुलाचा वापर करायचा, याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एका लाखाचे 2 लाख कधी होतील
सध्या, बऱ्याच बँका FD वरील गुंतवणूकीसाठी वार्षिक 8.50 % च्या आसपास व्याज ऑफर करत आहेय. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये हा व्याजदर थोडा जास्त आहे.
जर आपण बहुतेक बँकांद्वारे ऑफर केलेल्या एफडीवरील सध्याच्या व्याजदरांचा अंदाज लावला तर, सुमारे 9 ते 11 वर्षांच्या कालावधीत पैसे दुप्पट होऊ शकतात. म्हणजे एका लाखाचे दोन लाख होण्यासाठी नऊ ते अकरा वर्षांचा काळ लागू शकतो.
FD मधील पैसे दुप्पट कधी होतील हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्मुला वापरा
जर तुम्हीही नजिकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल आणि तुम्ही गुंतवलेला पैसा किती वर्षांनी दुप्पट होणार हे जाणून घ्यायचे असेल तर यासाठी एक फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. पण, हा फॉर्मुला वापरण्यासाठी मात्र तुम्हाला त्या बँकेकडुन एफडीवर किती व्याज दिले जात आहे याची माहिती असणे आवश्यक आहे.
एफडी मध्ये केलेली गुंतवणूक किती वर्षांनी दुप्पट होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्या व्याजदराने ७२ ला भागावे लागणार आहे. आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून एफडीमधील पैसा किती वर्षांनी दुप्पट होणार हे पाहणार आहोत.
सध्या देशातील सर्वात सरकारी बँकेच्या माध्यमातून अर्थातच एसबीआयच्या माध्यमातून दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी एफडीवर सात टक्के दराने व्याज ऑफर केले जात आहे. तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 6.5% एवढे व्याज दिले जात आहे.
जर समजा एखाद्याने या बँकेच्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीत गुंतवणूक केली असेल तर 72/6.5 = 11.07 म्हणजे अकरा वर्षांच्या कालावधीत या योजनेत गुंतवलेली अमाऊंट दुप्पट होणार आहे. याच प्रकारे तुम्ही इतरही बँकांच्या एफडीचे व्याजदर जाणून किती कालावधीत त्या FD मध्ये गुंतवणूक केलेला पैसा दुप्पट होणार हे जाणून घेऊ शकता.