FD News : भारतात आजही अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला अधिक महत्त्व दाखवतात. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. मात्र शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत बँकेच्या एफडी योजनेत, आरडी योजनेत आणि सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे.
दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी आगामी काळात बँकेच्या एफडी योजनेत पैशांची गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.
कारण की, आज आपण तीन वर्षांच्या एफडी स्कीम वर सर्वाधिक व्याजदर ऑफर करणाऱ्या बँकांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
3 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
SBM बँक : तीन वर्षांच्या कालावधीसाठी एफडी करण्याच्या प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एसबीएम बँक ही सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. कारण की ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर सर्वात जास्त व्याज ऑफर करत आहे. या बँकेकडून सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 8.10% व्याज आणि ज्येष्ठ ग्राहकांना 8.60% व्याज ऑफर केले जात आहे.
DCB बँक : ही बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांच्या यादीत या बँकेचा दुसरा क्रमांक लागतो. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 8% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.50% व्याज देत आहे.
येस बँक : खाजगी क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय बँक म्हणजेच येस बँक. ही बँक तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर चांगले व्याज ऑफर करत आहे. या कालावधीच्या एफडीत या बँकेत सामान्य ग्राहकांनी पैसा ओतला तर त्यांना 7.75% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.25% या इंटरेस्ट रेट ने परतावा दिला जाणार आहे.
IndusInd बँक : ही देखील खाजगी क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. अलीकडे या खाजगी बँकेने देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडी व्याजदरात मोठी वाढ केली आहे. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सध्या स्थितीला ही बँक तीन वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.50% आणि ज्येष्ठ ग्राहकांना आठ टक्के इंटरेस्ट रेटने व्याज ऑफर करत आहे.
बँक ऑफ बडोदा : ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगला परतावा देते. ही एफ डी वर सर्वात जास्त व्याज परतावा देणारी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.05% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55% दराने व्याज देत आहे.