FD News : फिक्स डिपॉझिटचा पर्याय हा भारतात गुंतवणुकीचा सर्वात बेस्ट पर्याय म्हणून ओळखला जातो. येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अनेकजण फिक्स डिपॉझिट करण्याला पसंती दाखवतात. दरम्यान जर तुमचीही फिक्स डिपॉझिट करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
कारण की, आज आपण 1095 दिवसांच्या एफडीवर अर्थातच तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँकेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज ऑफर करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५% एवढे व्याज दिले जात आहे.
अशा परिस्थितीत जर ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी या बँकेच्या 3 वर्षांच्या एफडी मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर एक लाख 26 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
ॲक्सिस बँक : ही बँक देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेकडून देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याज दिले जात आहे.
ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर ७.६०% एवढे व्याजदर पूरवत असल्याची माहिती समोर आली आहे.
जर या बँकेच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना तीन वर्षांनी एक लाख 25 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
एचडीएफसी बँक : बँक जेष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.50% एवढे व्याज पुरवत आहे. जर समजा या तीन वर्षांच्या एफडी मध्ये एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर एक लाख 25 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
आयसीआयसीआय बँक : ही बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांच्या एफडीवर चांगले व्याज देत आहे. या बँकेकडून तीन वर्षांच्या एफडी साठी जेष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
पंजाब नॅशनल बँक : ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर ७.५०% एवढे व्याजदर ऑफर करत आहे. या बँकेत तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये मॅच्युरिटीवर 1.25 लाख रुपये होतील.