FD News : आपल्यापैकी अनेकजण कष्टाने कमावलेला पैसा कुठे ना कुठे गुंतवण्याच्या तयारीत आहेत. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैशांची इन्व्हेस्टमेंट केली आहे. मात्र आजही देशात असे अनेक नागरिक आहेत जे की सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला पसंती दाखवले जाते.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या काळात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका बँकेने आपल्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.
कोणत्या बँकेने वाढवले एफडी वरील व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार, डीसीबी बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. डीसीबी बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने काल अर्थातच 22 मे 2024 ला एफडी व्याजदर सुधारित केले आहेत.
हे सुधारित व्याजदर कालपासूनच लागू झाले आहेत. या सुधारित व्याजदरानुसार आता डीसीबी बँकेत एफडी करू इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांना 8% आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना 8.55% एवढे व्याज मिळणार आहे.
विशेष म्हणजे या बँकेच्या सेविंग अकाउंट मध्ये डिपॉझिट असलेल्या पैशांवर देखील 8 टक्के दराने व्याज मिळणार आहे. दरम्यान, आता आपण डीसीबी बँकेचे सुधारित एफडी व्याजदर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डीसीबी बँकेचे सुधारित व्याजदर
सात दिवस ते 45 दिवस कालावधीच्या FD वर : 3.75%
46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीच्या FD वर : 4.00 टक्के
91 दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर : 4.75 टक्के
6 महिने ते 10 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर : 6.20 टक्के
10 महिने ते 12 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर : 7.25 टक्के
१२ महिन्यांच्या एफडीवर : ७.१० टक्के
12 महिने, 1 दिवस ते 12 महिने आणि 10 दिवसांच्या कालावधीच्या FD वर : 7.75 टक्के
12 महिने 11 दिवस ते 18 महिने 5 दिवसांच्या FD वर : 7.15 टक्के
18 महिने, सहा दिवस ते 700 दिवसांच्या FD वर : 7.40 टक्के
700 दिवस ते 25 महिन्यांच्या कालावधीसह FD वर : 7.50 टक्के
25 महिन्यांच्या कालावधीसह FD वर : 7.75 टक्के
२६ महिने ते ३७ महिन्यांच्या कालावधीतील एफडीवर : ७.४० टक्के
37 महिन्यांच्या कालावधीसह FD वर : 7.75 टक्के
37 महिने ते 61 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर : 7.40 टक्के
61 महिन्यांच्या कालावधीसह FD वर : 7.65 टक्के
61 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर : 7.25 टक्के