FD News : FD अर्थातच फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील एका लोकप्रिय बँकेने आपल्या लोकप्रिय योजनेच्या व्याजदरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
खरतर, अलीकडे एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे एफडीवर आता अनेक बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज ऑफर केले जात आहे.
काही स्मॉल फायनान्स बँकां तर अनेक प्रमुख सरकारी आणि प्रायव्हेट बँकांपेक्षा अधिकचे व्याज पुरवत आहेत. त्यामुळे स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळतोय.
दरम्यान देशातील अशाच एका स्मॉल फायनान्स बँकेने आणखी एकदा FD च्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे. एक मार्च 2024 पासून सदर बँकेने FD व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे या स्मॉल फायनान्स बँकेत म्हणजे SFB मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता चांगले रिटर्न मिळणार आहेत.
कोणत्या बँकेने वाढवले व्याजदर ?
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडी वरील व्याजदर वाढली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या काही निवडक मुदतीच्या FD वरील व्याज वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
नुकताच अर्थातच एक मार्च रोजी हा निर्णय झाला असून नवीन व्याजदर 1 मार्च 2024 पासून लागू झाले आहेत. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 25 महिन्यांच्या एफडीवरील व्याजदरात 0.41 टक्क्यांनी वाढ केली आहे.
याबाबत बँकेने प्रसिद्धीपत्रक जारी करून विस्तार माहिती आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध केली आहे. या बदलानंतर आता बँक सामान्य नागरिकांना २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर ४ टक्के ते ९.०१ टक्के व्याज देत आहे.
त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 9.25 टक्के व्याजदर देत आहे. अर्थातच बँकेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना अधिकचा प्रताप दिला जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांना 0.50% पर्यंत अधिक परतावा बँकेकडून दिला जात असल्याने या बँकेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चांगला दिलासा मिळत आहे.