FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे ऑप्शन्स खुले झाले आहेत. बहूकष्टाने कमावलेला पैसा वाढावा यासाठी अनेक जण आपल्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यास पसंती दाखवतात. यामुळे बँकेच्या एफडीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
जर तुमचीही बँकेच्या एफडीत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच विशेष राहणार आहे. कारण की आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर 9% पेक्षा अधिकचे व्याज देत आहेत.
खरेतर, सध्याचा कालावधी हा एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. तज्ञांनी सध्या बँकांकडून एफडीसाठी अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीसाठी चांगले व्याज ऑफर केले जात असल्याने हा कालावधी एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला आहे.
यामुळे जर तुम्हालाही एफडीमधून चांगला परतावा मिळवायचा असेल तर हा कालावधी गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र असे असले तरी ज्या बँका चांगले व्याजदर ऑफर करत आहेत अशा बँकांमध्येच एफडी करणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करणाऱ्या बँकांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक : ही बँक एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेकडून सामान्य लोकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवींवर 4% ते 9% व्याज ऑफर केले जात आहे.
या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर जास्तीत जास्त 9% व्याज ऑफर केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब अशी की या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज मिळत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : या बँकेकडूनही एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा दिला जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतची एफडी ऑफर केली जात आहे.
या एफडी वर बँकेकडून 3.60% ते 9.21% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. या बँकेत सर्वाधिक व्याज दर 9.21% आहे, जो 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे. अर्थातच या बँकेत एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळणार आहे.
जना स्मॉल फायनान्स बँक : या बँकेकडून सुद्धा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बँक सात दिवस ते दहा वर्ष कालावधीची एफडी ऑफर करत आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 3.50% ते 9% एवढे व्याज दिले जात आहे. सर्वाधिक व्याज दर 9% आहे, जो 365 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील एफडी करणाऱ्यांसाठी एक बेस्ट पर्याय ठरणार आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्ष कालावधीच्या ठेवींवर अर्थातच फिक्स डिपॉझिट वर 4.50% ते 9.10% पर्यंत व्याज ऑफर करत आहे. या बँकेकडून दोन वर्ष आणि दोन दिवसात परिपक्व होणाऱ्या एफडी साठी 9.10% एवढे व्याजदर पुरवले जात आहे. हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना लागू आहे. सामान्य गुंतवणूकदारांना यापेक्षा 0.50 टक्के कमी व्याज मिळते.