FD News : भारतात अलीकडे सर्वजण गुंतवणुकीकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत. जर तुम्हीही तुमचा पैसा कुठे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर मग आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण की, आज एफडी अर्थातच मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवू इच्छिणाऱ्यांसाठी एफडीवर नऊ टक्के पेक्षा अधिकचे व्याज देणाऱ्या बँकांची माहिती घेऊन आलो आहोत.
खरेतर पाच एप्रिलला आरबीआयची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आरबीआयने रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे एफडीचे व्याजदर कमी होणार नाही हे नक्की झाले.
यामुळे सध्याचा काळ हा एफडीसाठी सर्वात अनुकूल असल्याचे मत काही जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. याचे कारण म्हणजे देशातील अनेक बँका एफडीवर चांगले व्याज देत आहेत.
परिणामी ज्यांना FD करायची असेल त्यांच्यासाठी हा काळ खूपच फायद्याचा राहिल अस बोललं जात आहे. दरम्यान आज आपण भारतातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर नऊ टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज देत आहेत.
एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या नॅशनल बँका
HDFC : प्रायव्हेट सेक्टर मधील एचडीएफसी ही सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर वाढीव व्याज देत आहे. 18 ते 21 महिने कालावधीच्या एफडी साठी ही बँक 7.25 टक्के एवढे व्याज ऑफर करत आहे.
SBI : एचडीएफसी प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. तसेच SBI ही पब्लिक सेक्टर मधील भारतातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक दोन ते तीन वर्षांचा एफडीवर सात टक्के एवढे व्याज देते. ही बँकेची सर्वाधिक व्याज देणारी नियमित एफडी योजना आहे.
आयसीआयसीआय बँक : ही देखील एक प्रमुख प्रायव्हेट बँक आहे. ही बँक पंधरा महिने ते दोन वर्ष कालावधीपर्यंतच्या एफडी साठी 7.20% एवढे व्याज ऑफर करत आहे.
एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या स्मॉल फायनान्स बँका
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : ही बँक FD वर सामान्य ग्राहकांना 8.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज देते तसेच जेष्ठ नागरिकांना ही बँक 9.25 टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहे.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक : ही बँक सामान्य ग्राहकांना 3.50% ते 8.70% एवढे व्याज देते. दुसरीकडे जेष्ठ नागरिकांना बँकेच्या माध्यमातून चार टक्के ते 9.20% एवढे व्याज दिले जातात.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : ही बँक पंधरा महिन्यांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 8.50% दराने व्याज देते आणि जेष्ठ गुंतवणूकदारांना नऊ टक्के या दराने व्याज देते.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : बँकेकडून FD करीता सामान्य ग्राहकांना चार टक्क्यांपासून ते 9 टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जाते. जेष्ठ गुंतवणूकदारांना मात्र ही बँक 4.40 % ते 9.25 टक्क्यांपर्यंतचे व्याज देते.