Kubota Tractor Franchise :- ट्रॅक्टर हे शेतीसाठी एक महत्त्वाचे असे यंत्र असून शेतीची पूर्व मशागती पासून तर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता भासते.
भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्माता कंपन्या असून प्रत्येक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत. यामध्ये जर आपण कुबोटा ट्रॅक्टरचा विचार केला तर ही एक भारतीय कृषी यंत्रसामग्री तयार करणारी कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून राईस ट्रान्सप्लांटर,
कम्बाईन हार्वेस्टर आणि पावर टिलर सारखी उपकरणे तयार केली जातात. ही कंपनी साधारणपणे 2008 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि तिचे मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. कुबोटा कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारे ट्रॅक्टर तयार करण्यासाठी ही कंपनी शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
शेतकऱ्यांच्या शेती संबंधित अनेक लहान ते मोठे गरजा पूर्ण करण्यासाठी कुबोटा ट्रॅक्टर परिपूर्ण आहे. जर आपण कुबोटा ट्रॅक्टरचा विचार केला तर ते साधारणपणे 21 ते 55 एचपी पावर मध्ये येतात.
सध्या भारतामध्ये 251 कुबोटा ट्रॅक्टर च्या डीलरशिप असून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. तुम्हाला देखील कुबोटा ट्रॅक्टरची फ्रेंचाईसी अर्थात डीलरशिप घ्यायची असेल तर तुम्ही या माध्यमातून चांगले उत्पन्न देखील मिळू शकतात.
म्हणून आपण या लेखामध्ये कुबोटा ट्रॅक्टरची डीलरशिप कशी घ्यावी याची प्रोसेस जाणून घेणार आहोत.
कुबोटा ट्रॅक्टर फ्रॅंचाईजी म्हणजे काय?
भारतातील अनेक बड्या कंपन्यांना त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या नावाने शाखा उघडतात आणि उत्पादन विकण्याचे अधिकार देत असतात व त्यालाच आपण डीलरशिप असे म्हणतो. अगदी याच पद्धतीने भारतातील मोठी ट्रॅक्टर कंपनी असलेली कुबोटा ही देखील नेटवर्क वाढवण्यासाठी फ्रेंचाईजी देत आहे.
कुबोटा ट्रॅक्टर फ्रॅंचाईजी साठी किती गुंतवणूक करावी लागते?
जर तुम्हाला देखील कुबोटा ट्रॅक्टर डीलरशिप अर्थात फ्रेंचायजी घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याकरिता 40 ते 50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यातील पाच ते दहा लाख रुपये तुम्हाला यामध्ये कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टर एजन्सी घेण्यासोबतच कंपनीचे पार्टस आणि सेवा विकण्याची देखील सुविधा तुम्हाला मिळत असते.
कुबोटा ट्रॅक्टर डीलरशिपसाठी आवश्यक जमीन
याकरिता तुम्हाला जागेची आवश्यकता असते तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात त्यावर जागेसाठी असणारी रक्कम ठरत असते. तुम्हाला जर ट्रॅक्टरची डीलरशिप घ्यायची असेल तर यामध्ये तुम्हाला स्टोअर रूम, शोरूम तसेच विक्री क्षेत्र यासाठी जागेची आवश्यकता भासते.
शोरूम करिता तुम्हाला अंदाजे पंधराशे ते दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा लागते तर स्टोर रूमकरिता अंदाजे पाचशे ते सातशे चौरस फूट क्षेत्र आवश्यक असते. तसेच इतर आवश्यक कामकाजासाठी अंदाजे 200 ते 300 चौरस फूट जागा लागते.
म्हणजेच एकूण तुम्हाला तीन ते चार हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता असते. या ठिकाणी तुम्हाला सर्विसिंगची सुविधा उपलब्ध करून द्यायचे असेल तर आणखीन जागा लागू शकते.
कुबोटा ट्रॅक्टर डीलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे
या डीलरशिप करिता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार कार्ड, रेशन कार्ड,विज बिल, बँक खात्याचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो तसेच ईमेल आयडी आणि फोन नंबर, शैक्षणिक पात्रता कागदपत्रे आणि इतर काही आवश्यक कागदपत्रे लागतात. तसेच भाडेपट्टी करार व आवश्यक एनओसी देखील आवश्यक असतात.
कुबोटा ट्रॅक्टर डीलरशिपसाठी अर्ज कसा करावा?
तुम्हाला देखील कुबोटा ट्रॅक्टर डीलरशिप घ्यायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल व त्या ठिकाणी तुम्हाला Become a Kubota Dealer या पर्यावर क्लिक करावे लागेल व त्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन पेज उघडेल.
या पेजवर तुम्हाला एक संपर्क पर्याय मिळेल व त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर त्या ठिकाणी एक फॉर्म उघडेल व त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून आपोआप संपर्क केला जाईल.
या ठिकाणी तुम्ही करू शकता संपर्क?
कुबोटा ट्रॅक्टर डीलरशिपच्या अधिक माहिती करिता तुम्ही 020-4860663 या नंबर वर संपर्क करू शकतात किंवा [email protected] या ईमेलवर देखील संपर्क साधू शकता.