Gas Cylinder Low Price : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य नागरिक इंधनाचे वाढत असलेले दर, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव यामुळे खूपच हैराण आहेत.
वाढत्या महागाईचा हा आलेख पाहता आता सर्वसामान्य नागरिकांना महिन्याकाठी येणारा पगार पुरत नाहीये. सर्वसामान्य नागरिक महिन्याला येणारा पगार पुरत नसल्याची तक्रार करत असून यामुळे अनेकांवर कर्ज देखील वाढत आहे. संसारासाठी आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता अनेकांना पैसा अपुरा पडू लागला आहे.
यामुळे महागाईचा वाढलेला हा आलेख कमी झाला पाहिजे आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला गेला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारकडूनही सर्वसामान्य गरीब जनतेसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत.
यामध्ये सर्वसामान्य लोकांना गॅस सिलेंडर स्वस्त दरात मिळावे यासाठी सुद्धा विशेष योजना चालवली जात आहे. पीएम उज्वला योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना गॅस सिलेंडरवर अनुदान दिले जात आहे. ही योजना 2016 मध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती.
सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांना 200 रुपये अनुदान दिले जात होते. मात्र आता हे अनुदान वाढवण्यात आले आहे. आता हे अनुदान तीनशे रुपये एवढे झाले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली आहे.
पुरी यांनी सांगितले की उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 903 रुपयांचे गॅस सिलेंडर 603 रुपयाला मिळत आहे. सर्वप्रथम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर भरताना 900 च रुपये द्यावे लागतात मात्र नंतर तीनशे रुपये त्यांच्या अकाउंटवर अनुदान म्हणून जमा केले जातात.
दरम्यान ज्या लोकांना अजून उज्वला योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी उज्वला योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गरीब जनतेसाठी आता ही योजना 2025 26 पर्यंत सुरू ठेवली जाणार आहे.
तोपर्यंत या योजनेअंतर्गत 75 लाख नवीन गॅस कनेक्शन सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जर तुम्हालाही पीएम उज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल अर्थातच सहाशे रुपये मिळत सिलेंडर हवे असेल तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
www.pmuy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्हाला उज्वला योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. सर्वप्रथम वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अप्लाई फॉर PMUY कनेक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
ज्या कंपनीचा गॅस सिलिंडर तुम्हाला घ्यायचा आहे ती कंपनी निवडा. यानंतर, कागदपत्रांसह सर्व माहिती भरा आणि Apply या बटणावर क्लिक करा. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काही दिवसात या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे.