Gold Loan Interest Rate : आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची गरज भासते. त्यावेळी आपण आपल्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे प्रथम पैशांची विचारणा करतो. जर मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैशांची ॲडजस्टमेंट झाली नाही तर आपण बँकेकडून कर्ज घेतो.
बँकेकडून काही वैयक्तिक कामांसाठी वैयक्तिक कर्ज घेतले जाते. मात्र वैयक्तिक कर्जासाठी बँकांच्या माध्यमातून खूपच अधिक व्याजदर आकारले जाते.
त्यामुळे अनेकजण, तज्ञ मंडळी बँक ग्राहकांना पर्सनल लोन खूपच गरजेचे असेल तेव्हाच घ्यावे अन्यथा इतर मार्गांनी पैशांची ऍडजेस्टमेंट करावी असा सल्ला देतात. तर काही तज्ञ लोक पर्सनल लोन घेण्याऐवजी गोल्ड लोन घेण्याचा सल्ला देतात.
तर तुमच्याकडे सोन असेल तर ते सोने तुम्ही बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकतात. विशेष म्हणजे गोल्ड लोनसाठी बँकेच्या माध्यमातून खूपच कमी व्याजदर आकारले जाते.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून जर 100 ग्रॅम सोने तारण ठेवून कर्ज घेतलं तर किती रुपयांचे गोल्ड लोन बँकेकडून मिळू शकते असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
दरम्यान, आज आपण एसबीआय बँकेकडे 100 ग्रॅम सोने तारण ठेवून किती कर्ज मिळेल आणि गोल्ड लोनसाठी एसबीआय बँक किती व्याजदर आकारते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
एसबीआय बँक गोल्ड लोनसाठी किती व्याज आकारते
मीडिया रिपोर्टनुसार एसबीआय बँकेकडून स्वस्तात गोल्ड लोन ऑफर केले जात आहे. ही बँक गोल्ड लोनसाठी 8.75% व्याजदर आकारते. गोल्ड लोनची विशेषता म्हणजे गोल्ड लोनसाठी चांगला सिबिल स्कोर असणे आवश्यक नसते.
कमी सिबिल स्कोर असला तरी देखील बँकेकडून गोल्ड लोन मिळते. याचे कारण म्हणजे गोल्ड लोन हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये येते. कारण की बँकेसाठी गोल्ड लोन करिता आपण सोने तारण ठेवत असतो. यामुळे बँकांना असे कर्ज देताना खूपच कमी रिस्क असते.
100 ग्रॅम सोन्यासाठी किती कर्ज
एसबीआय कडून मिळालेल्या माहितीनुसार, जर एसबीआयमध्ये 100 ग्रॅम सोने तारण ठेवले तर बँकेच्या माध्यमातून चार लाख 87 हजार 135 रुपयांचे कर्ज देऊ शकते.
शंभर ग्रॅम सोन्यासाठी या बँकेच्या माध्यमातून यापेक्षा जास्तीचे कर्ज तुम्हाला मंजूर होणार नाही. मात्र 22 कॅरेट सोन्यासाठीच एवढी रक्कम दिली जाणार आहे. जर सोन्याची शुद्धता यापेक्षा कमी असेल तर साहजिकच कर्जाची रक्कम ही कमी होणार आहे.