Gold Rate Will Hike : तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती 70,000 पार गेल्या होत्या. पण, गेल्या महिन्यापर्यंत सात हजार रुपये प्रति ग्रॅम प्रमाणे विकला जाणारा हा धातू आता सहा हजार रुपयांच्या आत आला आहे. यामुळे जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा काळ सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.
कारण की आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या फेस्टिव सीझनमध्ये याचे भाव वाढू शकतात असे म्हटले जात आहे. भारतात सोन्याला आधीपासूनच फार महत्त्व आहे. हिंदू सनातन धर्मात सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याची खरेदी करणे अतिशय पवित्र समजले जाते.
यामुळे जेव्हाही सणासुदीचा काळ सुरू होतो तेव्हा सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते. विजयादशमी अर्थातच दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया यांसारख्या मोठ्या सणांमध्ये सोन्याची खरेदी वाढत असते. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांनी येणाऱ्या विजयादशमीच्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारून चालणार नाही.
हेच कारण आहे की काही तज्ञ लोक हा काळ सोने खरेदीसाठी सर्वात बेस्ट असल्याचा दावा करत आहेत. गेल्या महिन्यात प्रति तोळा सोन्याची किंमत 70,000 रुपये होती मात्र आता हा भाव 60 हजारावर आला आहे.
दरम्यान सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असून आजही अर्थातच 29 जुलै 2024 ला ही सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण आठवड्यातील पहिल्या दिवसाचे या मौल्यवान धातूचे आणि चांदीचे भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किंमती
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीमध्ये आज 22 कॅरेट सोने 6,339 रुपये प्रतिक्रम आणि 24 कॅरेट सोने 6,914 प्रति ग्राम या दरात उपलब्ध आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोने 6324 आणि 24 कॅरेट सोने 6899 रुपये प्रति ग्रॅम या दरात उपलब्ध आहे.
पुणे : पुण्यात आज 22 कॅरेट सोने 6,324 आणि 24 कॅरेट सोने 6899 रुपये प्रति ग्राम या दरात उपलब्ध आहे.
जयपूर : राजस्थानच्या राजधानीत अर्थातच जयपुर मध्ये आज 22 कॅरेट सोने 6339 रुपये आणि 24 कॅरेट सोने 6,914 प्रति ग्राम या दरात उपलब्ध आहे
अहमदाबाद : गुजरातच्या राजधानीत अर्थात अहमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोने 6,904 आणि 22 कॅरेट सोने 6329 रुपये प्रति ग्राम या दरात उपलब्ध आहे.
चांदीचा भाव काय आहे?
सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतही सातत्याने घसरण होत आहे. यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील हा काळ चांगला फायद्याचा ठरू शकतो असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या किमतीत प्रति किलो 100 रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीचा आजचा भाव 84 हजार चारशे रुपये प्रति किलो एवढा आहे. देशातील सर्वच शहरांमध्ये चांदीचा भाव सारखा असतो. म्हणजेच आज संपूर्ण देशात चांदीचा भाव हा 84 हजार चारशे रुपये प्रति किलो एवढा राहणार आहे.