Gold Rates : आपल्याकडे सोन्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करणे शुभ समजले जाते. यामुळे आपल्या देशात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. याशिवाय देशातील महिला सोन्यात गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवतात.
सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही अधिकतर फायद्याची ठरली आहे. त्यामुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असतात.
मात्र भारतात सोन्याचे दर हे खूपच वाढलेले आहेत. आपल्याकडे प्रति दहा ग्रॅम सोन्यासाठी 66 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागत आहे.
म्हणजेच सहा हजार सहाशे रुपये प्रति ग्राम एवढी सोन्याची किंमत झाली आहे. तथापि जगात असेही काही देश आहेत जिथे आपल्या भारतापेक्षा स्वस्त सोने मिळते.
दरम्यान आज आपण अशा काही देशांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या ठिकाणी दहा ग्रॅम सोन्याची किंमत आपल्या भारतापेक्षा बारा हजार रुपयांपर्यंत स्वस्त आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया जगातील कोणत्या देशात आपल्या भारतापेक्षा स्वस्त सोने मिळत आहे.
या देशात मिळते स्वस्त सोने
स्वित्झर्लंड : भारतात प्रति दहा ग्राम सोन्याची किंमत 66 हजार रुपये आहे. मात्र स्वित्झर्लंडमध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 54 हजार रुपये एवढी आहे. म्हणजेच दहा ग्रॅम मागे 12 हजार रुपयांचा फरक आहे.
सौदी अरब : हा देखील असा एक देश आहे जिथे सोने भारतापेक्षा स्वस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 54 हजार दोनशे रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच या ठिकाणी 10 ग्रॅम मागे 11800 रुपयांचा फरक आहे. भारतापेक्षा सौदी अरेबिया मध्ये सोने प्रति दहा ग्रॅम 11800 रुपयांनी स्वस्त मिळते.
मेक्सिको : मेक्सिको मध्ये देखील आपल्या देशापेक्षा स्वस्त सोने मिळते. मिळालेल्या माहितीनुसार या देशात 5436 रुपये प्रति ग्राम या दरात सोने मिळते. म्हणजेच प्रति दहा ग्रॅम साठी 54 हजार 360 रुपये एवढी रक्कम या ठिकाणी खर्च करावी लागते.
हॉंगकॉंग : या देशातही सोने खूपच स्वस्त आहे. भारताशी तुलना केली असता हॉंगकॉंग मध्ये सोन्याच्या किमती कमी भासतात. या देशात 5418 प्रति ग्रॅम या दरात सोने उपलब्ध होते. म्हणजेच दहा ग्रॅम सोन्यासाठी येथे 54 हजार 180 रुपये एवढा खर्च करावा लागतो.
दुबई : दुबईमध्ये 55 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम असे सोन्याचे भाव आहेत. म्हणजेच भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त आहे. या देशात भारतापेक्षा प्रतिदहा ग्राम दहा हजार रुपयांपेक्षा अधिक स्वस्त सोने मिळणार आहे.