Investment Plan : प्रत्येकाला आपल्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असते. अनेक जण मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. सोने आणि रिअल इस्टेट हे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अनेकांना मात्र असा प्रश्न पडतो की सोने आणि रिअल इस्टेट यापैकी सर्वात चांगली गुंतवणूक कोणती. म्हणजे सोन्यात गुंतवणूक केली तर चांगला लाभ मिळणार की रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली तर चांगला लाभ मिळणार हा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो.

सध्या लोक त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार सोने आणि रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवतात. रियल इस्टेट आणि सोन्यात केलेली गुंतवणूक वेगवेगळ्या परिस्थितीत महत्त्वपूर्ण असल्याचे मत तज्ञ लोकांनी वर्तवले आहेत. पण या दोघांमध्ये गुंतवणूक करण्याचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. आज आपण याचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत. या दोघांमध्ये पैसे गुंतवणे कसे योग्य आहे हेच समजून घेण्याचा प्रयत्न येथे करूया.

Advertisement

सोन्यात गुंतवणूक
भारतात फार पूर्वीपासून सोन्यात गुंतवणूक करण्याला फारच महत्त्व आहे. खरे तर दिवाळी, विजयादशमी यांसारख्या सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व देखील आहे. या काळात सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. हेच कारण आहे की, सण-उत्सवाच्या काळात त्याची खरेदी वाढते. याच काळात सोन्याच्या किमती देखील मोठ्या वाढतात. दरम्यान सोन्यामधील गुंतवणूक काही अंशी फायदेशीर आहे.

जेव्हा एखादी दुर्घटना घडते आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज भासते तेव्हा सोन्याचा पर्याय हा फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे सोन्यातून मिळणाऱ्या परताव्याचा जर आपण विचार केला तर सोन्याचा भाव अनेक दशकांपासून स्थिर गतीने वाढत आहे. म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. यात गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सोने खरेदी-विक्रीत अडचण येत नाही. आर्थिक अस्थिरता टाळण्यासाठी सोने हा उपायही ठरू शकतो.

Advertisement

सोन्यात गुंतवणुकीचे तोटे : सोन्यात गुंतवणूक करत असाल तर यामध्ये तुम्हाला रिअल इस्टेट सारखा किंवा शेअर मार्केट सारखा बंपर परतावा मिळणार नाही हे लक्षात घ्या. सोन्यामधील उत्पन्न हे तुलनेने कमी आहे. तसेच सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुद्धा होऊ शकतात. विविध घटक सोन्याच्या किमतींवर परिणाम करत असतात.

तसेच, सोने सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. सोन्याची चोरी होण्याची भीती असते. यामुळे ते घरच्या तिजोरीत ठेवले जाऊ शकत नाही. शिवाय घरात सोने ठेवण्यावर काही निर्बंध देखील आहेत. तसेच यामध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला कोणतीही कर सूट मिळत नाही.

Advertisement

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक : रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. ते म्हणतात की, मालमत्तेचे मूल्य कालांतराने लक्षणीय वाढते. मालमत्तेची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, वाढते नागरिकीकरण या सर्व पार्श्वभूमीवर जमिनीच्या आणि घरांच्या किमती वाढतच राहणार आहेत.

यासाठी मात्र तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार. पण येथून भरीव परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र मालमत्तेचे स्थान आणि बाजार स्थिती यांसारखे घटक त्याचे भाडे उत्पन्न आणि मूल्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून, कोणतीही मालमत्ता अत्यंत हुशारीने निवडा. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हे महागाईपासून तुमचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी एक उत्तम धोरण आहे.

Advertisement

रियल इस्टेट गुंतवणुकीचे नुकसान : स्थावर मालमत्तेत अर्थातच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे काही तोटे देखील आहेत. यातील पहिला आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे रियल इस्टेट मधील गुंतवणूक जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा लगेचच विकता येत नाही. मालमत्तेचे रोख रकमेत रूपांतर करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, हा या गुंतवणुकीचा सर्वात मोठा तोटा आहे.

हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की मालमत्तेची मालकी म्हणजे कर, देखभाल, उपयुक्तता आणि दुरुस्ती यासह चालू खर्चाचा सामना देखील करावा लागतो. अशा परिस्थितीत काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. रिअल इस्टेट खरेदी आणि विक्रीची प्रक्रिया लांबलचक आणि गुंतागुंतीची असू शकते, त्यामुळे संभाव्य तोटे टाळण्यासाठी आणि तुमचा दीर्घकालीन नफा वाढवण्यासाठी बाजाराची चांगली समज असणे महत्त्वाचे आहे.

Advertisement

सणासुदीच्या काळात विकासक अनेकदा विशेष ऑफर आणि सवलती लॉन्च करतात. कमी किमतीत त्यांना हवी असलेली घरे सुरक्षित करण्यासाठी खरेदीदार या सवलतींचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे ही गुंतवणूकीची उत्तम संधी असते.
कोणती गुंतवणूक ठरणार फायद्याचे

दोन्ही गोल्ड किंवा रिअल इस्टेट यामध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेताना, तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि गुंतवणुकीची क्षमता विचारात घेणे शहाणपणाचे ठरणार आहे. तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे की अल्प कालावधीत गुंतवणूक करायची आहे याचा देखील विचार तुम्हाला करावा लागणार आहे. भविष्यातील तुमच आर्थिक नियोजन विचारात घ्यावे लागणार आहे. सोने खरेदी आणि विक्री करणे सोयीचे आहे तर रिअल इस्टेटमधील तुमची गुंतवणूक उच्च परतावा देऊ शकते. त्यामुळे नीट विचार करूनच निर्णय घ्या.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *