Mhada News : डोंबिवली, वसई, विरार, नवी मुंबई आणि ठाण्यात घर घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई, नवी मुंबई, नासिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरात घर घेण्याचा म्हटलं म्हणजे अलीकडे अवघड बाब बनली आहे.
घरांच्या किमतीचा आकडा ऐकूनच पायाखालची जमीन सरकते. यामुळे सर्वसामान्यांना जर या शहरात आपल्या हक्काचे, स्वप्नाचे घर हवे असेल तर म्हाडा आणि सिडकोच्या घरांचीच वाट पहावी लागते. दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाकडून लवकरच लॉटरी काढली जाणार आहे.
एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून दिवाळीमध्ये एक मोठी सोडत काढली जाणार आहे. या सोडती मध्ये गेल्या सोडतीत विक्री न झालेल्या घरांचा देखील समावेश केला जाणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, कोकण मंडळांने नुकत्याच काही दिवसांपूर्वी 4,654 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र ही सोडत नवीन प्रक्रियेद्वारे पार पडली. म्हाडाच्या नवीन प्रणालीनुसार आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना उमेदवारांना सर्व कागदपत्रे आधीच लागतात.
मात्र अनेकांना ही कागदपत्रे जमवता आली नाहीत. परिणामी, अनेक लोक इच्छा असूनही या घरांसाठी अर्ज सादर करू शकले नाहीत. मात्र ज्या लोकांना कोकण मंडळाच्या गेल्या सोडतीमध्ये अर्ज कागदपत्रांअभावी सादर करता आला नाही अशा लोकांना दिवाळीमध्ये एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. दिवाळीमध्ये म्हाडाकडून पुन्हा एकदा सोडत काढली जाणार आहे.
कोणत्या घरांचा राहणार समावेश?
म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीजवळील कल्याण तालुक्यातील घारीवली आणि उसरगाव भागात रुणवाल समूहाच्या प्रकल्पातील 621 घरे, याशिवाय वसई-विरार, ठाणे आणि नवी मुंबईतील घरे या नवीन सोडती मध्ये उपलब्ध होणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मंडळाच्या प्रधान मंदिर आवास योजनेतील घरेही पूर्ण होणार आहेत. यामुळे ही देखील घरे कोकण मंडळाच्या आगामी सोडतीत समाविष्ट केले जातील अशी माहिती समोर आली आहे. मात्र, या सोडतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या घरांबाबत आणि घरांच्या किमती बाबत कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
परंतु लवकरच याबाबत देखील अपडेट समोर येतील. एकंदरीत म्हाडा कोकण मंडळाकडून लवकरच एक मोठी घर सोडत निघणार आहे. ही डोंबिवली, ठाणे, वसई विरार, नवी मुंबई या परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी निश्चितच आनंदाची बाब राहणार आहे.