Cotton Rate : कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखल जात. या पिकाची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील कापसाचे पीक उत्पादित होत आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला तर कापसाचे आगार म्हणून ओळखतात.

या संबंधित भागातील शेतकऱ्यांचे कापसाच्या पिकावर अर्थकारण अवलंबून असते. गेल्या हंगामापासून मात्र कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. एक तर कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. बी-बियाणे, खत, औषध यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मजुरीचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Advertisement

अशा परिस्थितीत कापूस पीक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे मजूर लागते. पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई होत आहे. म्हणून मजूर टंचाईचा देखील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मजूर टंचाई होत असल्याने शेतकऱ्यांना अधिकची मजुरी देऊन शेतात मजूर बोलवावे लागत आहे. परिणामी आता हे पीक खर्चीक बनले आहे.

तथापि मालाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी यंदाही या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. कमी पाऊस झालेला असतानाही कापूस लागवडीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. याचा मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कारण की, यंदा कमी पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे.

Advertisement

शिवाय बाजारात कापसाला चांगला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. गेल्या आठवड्यात तर कापसाला मात्र 7000 ते 7200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

काल झालेल्या लिलावात राज्यात कापसाला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमाल 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला आहे.

Advertisement

तसेच या मार्केटमध्ये काल कापूस किमान सात हजार रुपये आणि सरासरी 7250 रुपये प्रतिक्विंटल यात रात्री केला गेला आहे. बाजारभावात थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.

परंतु कापसाला किमान 8,000 ते 10 हजाराचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. यापेक्षा कमी भाव मिळाला तर हे पीक कोणत्याच परिस्थितीत परवडत नाही असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे आता भविष्यात कापसाला काय भाव मिळणार यावरच शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून राहणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *