7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 18व्या लोकसभेसाठी निवडणुका आयोजित करण्यात आल्या असून सध्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.
मतदान पूर्ण झाल्यानंतर चार जून 2024 ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या संपूर्ण देशभर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळी सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, केंद्रातील सरकारने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के एवढा केला होता.
महागाई भत्ता 50% झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते वाढवले गेले आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात निश्चितच मोठी वाढ झाली असून यामुळे त्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळत आहे.
विशेष म्हणजे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम देखील वाढवण्यात आली आहे. परिणामी सेवानिवृत्तीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. त्यामुळे सध्या स्थितीला सरकारी नोकरदार मंडळींमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
निवडणुकीच्या काळात घेण्यात आलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा लाभप्रद ठरणार आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्या पुर्ण होतं नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांची हीच नाराजी दूर करण्यासाठी आता सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच ग्रॅच्यूटीच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाला असल्याने ग्रॅच्यूटीच्या रकमेत वाढ करणे अनिवार्य होते.
यानुसार, सरकारने ग्रॅच्युइटीची रक्कम वाढवली आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या ग्रॅच्युइटी तथा डेथ ग्रॅच्युएटीच्या रकमेत 25% एवढी वाढ करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूटी म्हणून कमाल वीस लाख रुपयांचा लाभ दिला जात होता.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपेक्षा जास्तीची ग्रॅज्युटीची रक्कम मिळत नव्हती. आता मात्र यामध्ये 25% एवढी वाढ झाली आहे, म्हणजे आता ग्रॅच्यूटीची रक्कम 20 लाख रुपयाची 25 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता कमाल 25 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्यूटी मिळणार आहे. विशेष बाब अशी की हा लाभ जेव्हापासून महागाई भत्ता 50% झाला आहे तेव्हापासून मिळणार आहे अर्थातच जानेवारी 2024 पासून हा लाभ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सदर नोकरदार मंडळीच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.