Pune Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. ही गाडी देशभर लोकप्रिय होत आहे. या एक्स्प्रेसबाबत प्रवाशांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळतं आहे. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे. प्रवाशांची हीच उत्सुकता लक्षात घेऊन रेल्वेकडूनही सातत्याने नव्या वंदे भारतच्या घोषणा केल्या जात आहेत. आतापर्यंत देशात ३४ वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवा सुरू झाल्या आहेत. आता आगामी काळात आणखी गाड्या वाढवण्याचे नियोजन केले जात आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, मार्च 2020 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. 18 डिसेंबरला पीएम मोदी वाराणसीतून आणखी एका वंदे भारताला झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी वाराणसी ते नवी दिल्ली दरम्यान सुरू होणार आहे. याआधीच या दोन शहरादरम्यान ही गाडी सुरू झाले आहे मात्र या सध्या स्थितीला सुरु असलेल्या गाडीत प्रवाशांची वाढती गर्दी पाहता या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला सुद्धा नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या थेट पुणे रेल्वे स्थानकावरून कोणतीच वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात नाही. पण आता थेट पुणे रेल्वे स्थानकावरूनच ही हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते सिकंदराबाद दरम्यान ही हाय स्पीड गाडी चालवली जाणार आहे.
पुणे-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
सध्या स्थितीला मुंबई ते सोलापूर दरम्यान सुरू असणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्यामार्गे धावत आहे. पण थेट पुण्यावरून ही गाडी अजूनही सुरू झालेली नाही. आता मात्र दक्षिण मध्य रेल्वे तेलंगणा आणि महाराष्ट्रातील सिकंदराबाद दरम्यान ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
वृत्तानुसार, ही ट्रेन या मार्गावरील सध्याच्या शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे. म्हणजे या मार्गावरील शताब्दी एक्सप्रेस बंद करून त्याजागी ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.
कुठं मिळणार थांबा
या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार याबाबत कोणतीच माहिती हत्या आलेली नाही. पण ही गाडी या दोन शहरा दरम्यानचा प्रवास साडेआठ तासात पूर्ण करण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्याच्या शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा या गाडीला कमी वेळ लागणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
ही गाडी शताब्दी एक्सप्रेस ज्या रेल्वे स्थानकावर थांबा घेते त्याच रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते. म्हणजे ही गाडी या मार्गावरील सिकंदराबाद, बेगमपेट, विकाराबाद जंक्शन, तंदूर, वाडी जंक्शन, कलबुर्गी जंक्शन, सोलापूर, पुणे या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेण्याची शक्यता आहे.