Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर, मुंबईमध्ये लोकलला लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. लोकलसोबतच शहरात बेस्टने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे.

दरम्यान बेस्ट प्रशासनाने बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या काही लोकांना शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार आता शहरात धावणाऱ्या बेस्ट बसेस मधून स्वमग्न (ऑटिस्टिक) व्यक्तींनाही प्रवास करण्यासाठी शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. म्हणजे या आजाराने ग्रसित लोकांना मोफत प्रवास या ठिकाणी करता येणार आहे. यामुळे या संबंधित व्यक्तींना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

Advertisement

बेस्ट उपक्रमाने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या स्थितीला बेस्टच्या बसेस मधून ४० टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमांकडून पुरवली जात आहे. मात्र या दिव्यांग प्रवाशांप्रमाणेच स्वमग्न व्यक्तींनाही बेस्ट बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली पाहिजे अशी मागणी केली जात होती.

दरम्यान, नागरिकांची ही मागणी बेस्ट उपक्रमाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बेस्ट बसेस मध्ये स्वमग्न व्यक्तींना देखील मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी मात्र संबंधित व्यक्तींना आजारपणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. म्हणजेच स्वमग्न असल्यास बाबतचे प्रमाणपत्र सदर व्यक्तींना सादर करावे लागणार आहे. प्रमाणपत्र असलेल्या लोकांनाच मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

Advertisement

हाती आलेल्या माहितीनुसार, या स्वमग्न लोकांना प्रमाणपत्राच्या साहाय्याने बेस्ट उपक्रमाच्या बस आगारातून उपलब्ध केलेल्या स्मार्टकार्डवर आधारित बसपास मिळेल अथवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बसपासची मुदत एक वर्ष राहणार आहे. म्हणजेच एक वर्षानंतर नव्याने प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि बसपासचे नूतनीकरण करावे लागणार आहे.

दरम्यान बेस्ट उपक्रमाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून अर्थातच 11 डिसेंबर 2023 पासून होणार आहे. म्हणजे उद्यापासून या संबंधित लोकांना आता मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी मात्र बेस्ट आगारातून त्यांना बस पास काढावा लागणार आहे. बस पास काढण्यासाठी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. बसपास एकदा की मंजूर झाला की त्यांना मोफत बेस्ट बसचा प्रवास करता येणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *