Google Pay And Paytm : यूपीआयने पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.
कॅशने व्यवहार करण्याऐवजी आता ऑनलाईन व्यवहार करण्यास नागरिकांकडून पसंती दाखवली जात आहे. ऑनलाइन पेमेंट साठी आपल्या देशात गुगल पे, पेटीएम सारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर केला जात आहे.
दरम्यान गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, फोन पे यांसारख्या UPI पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी आरबीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यूपीआय लिमिट वाढवण्याचे जाहीर केले आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.
दास यांनी सांगितल्याप्रमाणे, यूपीआय ट्रांजेक्शनची लिमिट आता एक लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख रुपये एवढी करण्यात आले आहे.
जर तुम्हीही यूपीआय द्वारे पेमेंट करत असाल म्हणजेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला ठाऊकच असेल की सध्या यूपीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी एक लिमिट सेट करून देण्यात आली आहे.
सध्या स्थितीला डेली UPI ट्रांजेक्शन लिमिट एक लाख रुपये एवढी आहे. आता मात्र ही लिमिट पाच लाखांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, शैक्षणिक संस्था आणि मेडिकल संस्थाना पेमेंट करण्यासाठीचं ही लिमिट वाढवण्यात आली आहे.
अर्थातच जर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला पूर्वीप्रमाणेचं फक्त एक लाख रुपयांपर्यंतचे यूपीआय ट्रांजेक्शन करता येणार आहे.
पण शैक्षणिक संस्था तसेच मेडिकल संस्था यांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचे ट्रांजेक्शन करता येणार आहे.