GooglePay Paytm Phonepe : भारतात गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराला चालना मिळाली आहे. आता पैशांचे व्यवहार कॅश ऐवजी डिजिटल झाले आहेत. आता डिजिटल पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केले जात आहेत.
फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग करून देशातील करोडो लोक पैशांचे व्यवहार करत आहेत. दरम्यान फोनपे, गुगल पे आणि पेटीएम वापरकर्त्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही लोकांचे गुगल पे, पेटीएम आणि फोन पे बंद होणार आहे. डिजिटल पेमेंट एप्लीकेशन वापरणाऱ्या अनेक वापरकर्त्यांचे यूपीआय आयडी बंद केल्या जाणार आहेत.
31 डिसेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे देशातील अनेक लोकांचे 31 डिसेंबर 2023 पासून फोन पे, गुगल पे आणि पेटीएम बंद होईल असे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या लोकांचे फोन पे, गुगल पे आणि पेटीएम बंद होऊ शकते आणि यामागे नेमके कारण काय आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
का बंद होणार
भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NPCI ने थर्ड पार्टी डिजिटल पेमेंट ऍप्सना नुकतेच महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानुसार, ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून निष्क्रिय असेल अशा लोकांचे अकाउंट बंद केले जाणार आहेत.
म्हणजेच ज्या लोकांनी गेल्या एका वर्षाच्या काळात फोन पे गुगल पे आणि पेटीएम सारख्या अँप्लिकेशनवरील यूपीआय आयडीवरुन कोणताच व्यवहार केलेला नसेल, कुठल्याच प्रकारचे ट्रांजेक्शन केलेले नसेल त्या लोकांचे अकाउंट म्हणजे UPI Id बंद केले जाणार आहेत. असे अकाउंट 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार अशी माहिती समोर आली आहे.
हा निर्णय घेण्याचे कारण काय ?
अनेक वेळा डिजिटल पेमेंट अँप्लिकेशन वापरणारे लोक नवीन नंबर घेतल्यानंतर त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता डिजिटल पेमेंट एप्लीकेशन मध्ये आपला नवीन युपीआय आयडी तयार करतात. असे केल्याने मात्र लोकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.
कारण की, मोबाईल नंबर नव्वद दिवस जर सक्रिय नसेल तर असा मोबाईल नंबर बंद केला जातो आणि हा नंबर दुसऱ्या व्यक्तीसाठी जारी केले जातात. अशा परिस्थितीत जर अशा निष्क्रिय नंबरावर यूपीआयडी सक्रिय असेल तर सदर व्यक्तीची या ठिकाणी मोठी फसवणूक होऊ शकते.
दरम्यान याच फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी एनपीसीआयकडून एका वर्षाभरापासून कोणत्याही प्रकारचे व्यवहार झालेले नसतील अशा यूपीआय आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच सूचनेनुसार आता देशभरातील एका वर्षापासून वापरात नसलेले यूपीआय आयडी हद्दबाहेर होणार आहेत.