Government Employee Credit Card : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला दिला जातो. याशिवाय त्यांना वेगवेगळे भत्ते देखील पुरवले जातात.
विशेष म्हणजे सरकारी नोकरीत खूपच सुरक्षितता असते. यामुळे अनेकजण सरकारी नोकरी करू इच्छित आहेत. सरकारी नोकरीचा लोभ भल्याभल्यांना आवरत नाही.
दरम्यान शासकीय सेवेत असलेल्या सरकारी नोकरदार वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या सरकारी नोकरदारासाठी बाजारात एक नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च झाले आहे.
क्रेडिट कार्डमुळे या नोकरदार मंडळींला काही विशेष लाभ मिळणार आहेत. दरम्यान, आज आपण कोणत्या बँकेने सरकारी नोकरदारांसाठी विशेष क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे, याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तसेच या क्रेडिट कार्डचे नेमके फायदे काय आहेत हे देखील आज थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बँकेने लॉन्च केले सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Credit Card
सरकारी नोकरदार मंडळीसाठी बाजारात एक नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च झाले आहे. सदर मंडळीला या क्रेडिट कार्ड मधून अनेक फायदे मिळणार आहेत. इंडसइंड बँकेने हे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. बँकेने याला सन्मान रुपे क्रेडिट कार्ड असे नाव दिले आहे.
हे upi enable क्रेडिट कार्ड आहे. यासाठी बँकेने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत भागीदारी केलेली आहे. या क्रेडिट कार्ड चे फायदे असे की याचा वापर केल्यास वेगवेगळ्या खर्चासाठी कॅशबॅक मिळणार आहे, कॉम्प्लिमेंटरी मूव्ही तिकीट मिळणार आहेत.
यासोबतच या क्रेडिट कार्डचा आयआरसीटीसी च्या व्यवहारात आणि पेट्रोल डिझेलच्या खरेदीमध्ये वापर केला तर सरचार्जवर सूट दिली जाणार आहे.
यामुळे दैनंदिन व्यवहार आधीच्या तुलनेत सोपे होणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचा विशेष गरजा भागवण्यासाठी हे क्रेडिट कार्ड बँकेने लॉन्च केले आहे.
निश्चितच या क्रेडिट कार्ड मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या दैनंदिन पैशांच्या गरजां यामुळे बऱ्यापैकी पूर्ण होतील अशी आशा आहे.