Government Employee DA Hike : सध्या संपूर्ण देशभरात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता चार टक्के वाढणार असे सांगितले जात होते.
परंतु आता महागाई भत्ता चार टक्के नाही तर केवळ तीन टक्के एवढा वाढणार असल्याचा दावा केला जातोय. यामुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्ता वाढी संदर्भात संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या डीएवाढीबाबत चर्चा सुरू आहेत ती डीए वाढ प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना केव्हा लागू होणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित केला जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ केव्हापासून लागू होऊ शकते याबाबत समोर आलेली नवीन अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महागाई भत्ता किती वाढणार
पीटीआईच्या एका रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून तीन टक्के वाढणार आहे. सध्या DA 42 टक्के एवढा आहे. यामध्ये तीन टक्के वाढ झाली तर हा महागाई भत्ता 45% एवढा होणार आहे.
31 जुलै रोजी, AICPI निर्देशांकाची जूनची आकडेवारी जाहीर करण्यात आली, त्यानुसार, जर गणना केली तर, महागाई भत्ता आणि महागाई सवलत तीन टक्क्यांनी वाढणार असे सदर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
केव्हापासून लागू होणार
ही वाढ सप्टेंबर महिन्यापासून लागू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. याबाबत अद्याप केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच वित्त विभागाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
परंतु सप्टेंबर महिन्यात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. निश्चितच पुढल्या महिन्यात जर याबाबत निर्णय झाला तर संबंधितांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पगार किती वाढणार?
जर महागाई भत्ता 45% झाला तर अठरा हजार रुपये किमान मुळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला आठ हजार शंभर रुपये एवढा महागाई भत्ता मिळेल. सध्या सदर कर्मचाऱ्याला प्रति महिना 7560 रुपये एवढा महागाई भत्ता मिळत असेल.
याचाच अर्थ तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ झाली तर 18 हजार रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 540 रुपये प्रतिमहिना वाढ होणार आहे. म्हणजे पगारात वार्षिक 6480 रुपयाची वाढ नमूद केली जाणार आहे.