Government Employee DA Hike : वर्ष 2023 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी खूपच खास राहिले आहे. या वर्षात सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे.
गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 4% आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्के असा एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ सदर मंडळीला मिळाला आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे.
अशातच आता शासनाच्या माध्यमातून काही केंद्रीय पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने केंद्रीय पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 15 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संबंधित पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होत आहे.
कोणत्या पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढला?
मिळालेल्या माहितीनुसार पाचवा वेतन आयोग अंतर्गत रिटायर झालेल्या पेन्शन धारकांना या महागाई भत्ता वाढीचा लाभ देऊ केला जाणार आहे. यासंबंधीत पेन्शन धारकांना आतापर्यंत 412% महागाई भत्ता लागू होता. पण आता यामध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली असून महागाई भत्ता 427 टक्क्यांवर पोहोचला आहे.
विशेष म्हणजे ही वाढ जुलै 2023 पासून लागू राहणार आहे. परिणामी सदर कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. परिणामी या नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी विशेष आनंदाची ठरणार आहे.
केंद्र सरकारचे संचालक रविंदर कुमार यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे. कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी (CPF) च्या लाभार्थ्यांसाठी महागाई सवलतीत वाढ करण्यास राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
आता त्यांना वाढीव महागाई सवलत देण्यात येणार आहे. जे मृत सीपीएफ लाभार्थी विधवा आहेत आणि पात्र आश्रित मुले आहेत त्यांनाही या वाढीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रविंदर कुमार यांच्या म्हणण्यानुसार, बँका पेन्शन विभागासोबत पेन्शनधारकांच्या महागाई रिलीफची गणना करतील.
तसेच, जे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागात आहेत त्यांच्या माहितीसाठी, हे नमूद करणे आवश्यक आहे की कॅग (भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक) यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगू ईच्छितो की, ही महागाई सवलत 1960 ते 1985 दरम्यान निवृत्त झालेल्यांसाठी आहे. त्यांना गट A, B, C आणि D नुसार अनुदानाची रक्कम मिळणार असल्याची मोठी माहिती संबंधिताच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे.
निश्चितच या सदर पेन्शन भोगींसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. या निर्णयामुळे सदर पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.