Government Employee DA Hike : गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिस पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र महागाई भत्ता बाबत विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. महागाई भत्ता म्हणजेच डीए केव्हा वाढणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे चित्र तयार होत आहे. कारण की केंद्र शासनाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जस की आपणास ठाऊकच आहे की पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे. यामुळे शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर याबाबतची घोषणा केंद्रातील मोदी सरकार लवकरच करणार आहे. या चालू महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा होऊ शकते.
केंद्र शासन महागाई भत्यात तीन टक्के एवढी वाढ करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्के एवढा आहे. या आधी तो 38 टक्के होता मात्र जानेवारी महिन्यापासून हा DA 42 टक्के झाला आहे. अशातच आता यामध्ये आणखी तीन टक्के वाढ होणार आहे.
म्हणजेच डीए 45 टक्के होणार असा दावा केला जात आहे. हा DA जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. याची घोषणा मात्र या चालू महिन्यात होणार आहे. याचाच अर्थ सप्टेंबर महिन्याच्या वेतनापासून, जे की ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांना दिले जाईल या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे.
जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्ग केली जाईल. निश्चितच याबाबतचा निर्णय जर या चालू महिन्यात घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.