Government Employee DA Hike : गेल्या काही वर्षांमध्ये खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपात होऊ लागली आहे. विशेषता कोरोना काळापासून नोकर कपातीचा आलेख वाढला आहे. यामुळे आता खाजगी क्षेत्रात नोकरी करण्याऐवजी सरकारी क्षेत्रात नोकरी करण्याला अधिक पसंती दाखवली जात आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकरीमध्ये असणारी सुरक्षितता आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा. दरम्यान देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे त्यांच्या पगारात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात हजारो रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे जर तुम्हीही सरकारी नोकरीत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी सेवेत कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
का बरं होणार पगार वाढ?
खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते. महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांसाठी लागू केली जाते. केंद्र शासनाने मार्च 2023 मध्ये जानेवारी महिन्यापासून ची डी ए वाढ लागू केली आहे.
आता जुलै महिन्यापासूनची डी ए वाढ लागू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबर महिन्यात घेतला जाणार आहे. याबाबत केंद्र शासनाने कोणतीच माहिती दिलेली नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ लागू केली जाईल आणि त्यांना महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील मिळेल असा दावा केला जात आहे.
किती वाढणार महागाई भत्ता
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा आहे. यामध्ये आता तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे जुलै महिन्यापासून डीए 45 टक्के एवढा होणार आहे.
याची घोषणा पुढल्या महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रातील मोदी सरकार करणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच जर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर गणेशोत्सवापूर्वी संबंधित लोकांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे.
पगारात किती वाढ होणार?
आता आपण केंद्र शासनाने पुढल्या महिन्यात हा निर्णय घेतला तर संबंधित नोकरदारांच्या पगारात किती वाढ होणार याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. जर समजा एखाद्याचा मूळ पगार 18 हजार रुपये आहे, तर सदर व्यक्तीला सध्याच्या दरानुसार म्हणजे 42 टक्के नुसार 7560 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळत आहे.
पण जेव्हा हा भत्ता 45% होईल तर महागाई भत्त्याची ही रक्कम आठ हजार शंभर रुपये होईल. याचाच अर्थ पगारात 540 रुपये प्रति महिना वाढ होईल. वार्षिक आधारावर विचार केला तर सदर नोकरदार व्यक्तीच्या पगारात 6480 रुपयाची वाढ होणार आहे.