Government Employee News : निवडणुकीच्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील तसेच मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी केंद्र शासनाकडून महागाई भत्ता वाढीची आणि घरभाडे भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. खरे तर केंद्र शासनाने गेल्या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता.
यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे. म्हणजेच याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता. दरम्यान महागाई भत्तात करण्यात आलेली ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.
वास्तविक, DA वाढ ही वर्षातून दोनदा होत असते. अर्थातच महागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जातो. सर्वप्रथम जानेवारी आणि मग जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात सुधारणा केली जात असते.
यामुळे आता जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील महागाई भत्ता वाढ देखील चार टक्क्यांनी होण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये वर्तवण्यात आली आहे.
म्हणजेच जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा थेट 50 टक्क्यांवर जाणार आहे. याचा परिणाम म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक विशेष भेट मिळणार आहे. ती म्हणजे घर भाडे भत्त्यात देखील वाढ होणार आहे.
असं सांगितलं जात आहे की, ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए 50 टक्के क्रॉस करेल त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हा तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण एच आर ए म्हणजेच घर भाडे भत्ता किती वाढणार याबाबत जाणून घेणार आहोत.
HRA किती वाढणार ?
मीडिया रिपोर्ट नुसार, पुढील महागाई भत्ता वाढीची घोषणा मार्च 2024 मध्ये केली जाणार आहे. तसेच डीए 50 टक्के झाल्यानंतर HRA वाढ दिली जाणार आहे. म्हणजेच एचआरए मार्च 2024 नंतर वाढवला जाईल. दरम्यान घर भाडे भत्ता अर्थातच HRA कर्मचाऱ्यांच्या शहरानुसार किंवा निवासस्थानावरून ठरवला जातो.
यासाठी एक्स, वाय आणि झेड अशा श्रेण्या तयार करण्यात आल्या आहेत. सध्या एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एचआरए दिला जात आहे.
मात्र आता या एचआरए मध्ये एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. यानुसार, X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 30 टक्के, Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 20 टक्के, Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 10 टक्के एवढा HRA मिळू शकतो असे सांगितले जात आहे.