Government Employee News : नवीन वर्ष अर्थातच 2024 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवघ्या काही तासांचा काळ बाकी आहे. येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. परिणामी आत्तापासूनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.
अनेकांनी आजचा प्लॅन देखील सेट करून ठेवला आहे. आज थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी अनेक लोक बाहेर पडणार आहेत.थर्टी फर्स्टला पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
अशातच, मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात डी ए वाढीचा लाभ मिळणार आहे. सोबतच या मंडळीला हाऊस रेंट अलाउन्सेस अर्थातच घर भाडे भत्त्याचा देखील लाभ मिळणार आहे.
यामुळे या सरकारी पगारदार लोकांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार असा दावा होत आहे. एकंदरीत या मंडळीला नवीन वर्षात दोन-दोन आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. आता आपण नवीन वर्षात या मंडळीचा महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता कितीने वाढणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
DA किती वाढणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारी नोकरदार मंडळीचा जानेवारी ते जून 2024 या सहामाहीसाठी DA म्हणजे महागाई भत्ता ४ ते ५ टक्के वाढू शकतो. याबाबत अजूनही शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आलेले नाही. मात्र अनेक प्रतिष्ठित रिपोर्ट्स मध्ये या मंडळीचा महागाई भत्ता चार टक्के किंवा पाच टक्के वाढणार असे बोलले जात आहे.
जर समजा सदर मंडळीचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला तर डीए 50 टक्के होईल. सध्या हा भत्ता 46 टक्के आहे. यात जर चार टक्के वाढ झाली तर हा भत्ता 50 टक्क्यांवर जाणार आहे आणि जर भत्त्यात 5 टक्के वाढ झाली तर तो 51 टक्क्यांवर जाणार आहे.
यामुळे आता या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 4% वाढतो की पाच टक्के हेच विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. तथापि निवडणुकांचे वर्ष पाहता यामध्ये पाच टक्क्यांपर्यंतची वाढ होणे अपेक्षित आहे. जर असे झाले तर निश्चितच संबंधित मंडळीला मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनात बऱ्यापैकी वाढ होणार आहे.
किती वाढणार HRA
एच आर ए अर्थातच हाऊस रेंट अलाऊन्सेस वाढवण्याबाबत सातवा वेतन आयोगात महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार जेव्हा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा एच आर ए देखील सुधारित केला गेला पाहिजे. म्हणजेच घर भाडे भत्ता नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वाढण्याची शक्यता आहे.
जर असे झाले तर निश्चितच संबंधित मंडळीच्या आनंदात भर पडणार आहे. सातवा वेतन आयोग अंतर्गत HRA साठी शहरानुसार श्रेणी तयार करण्यात आली आहे. या श्रेणी X, Y आणि Z अशा आहेत. यामध्ये X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना सध्या 27% वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घरभाडे भत्ता मिळत आहे.
पण 50% महागाई भत्ता झाल्यानंतर या घर भाडे भत्त्यात सुधारणा होणार असून यामध्ये एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंतची वाढ केली जाणार आहे. यानुसार घर भाडे भत्ता X श्रेणी 30%, Y श्रेणी 20 टक्के आणि Z श्रेणी दहा टक्के एवढा होण्याची शक्यता आहे.