Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबाबत आहे. ही बातमी महागाई भत्ता संदर्भात आहे.
खरंतर केंद्र शासनाने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अर्थातच मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के एवढी वाढ केली आहे. त्यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए 42 टक्के एवढा बनला आहे. याआधी हा भत्ता 38% एवढा होता.
केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील राज्य सरकारने DA वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातच याबाबतचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आहे.
या शासन निर्णयानुसार म्हणजेच जीआर नुसार आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 टक्के एवढा डीए मिळू लागला आहे. याआधी राज्य कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के एवढा DA मिळत होता म्हणजेच यामध्ये देखील चार टक्के वाढ झाली आहे.
अशातच केंद्रातील काही निवडक कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केंद्र शासनाने मोठी भेट दिली आहे. आता केंद्र शासनाने वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस स्तरावरील तसेच निम्न पदांच्या सीपीएससी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या DA बाबत मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने या संबंधित कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यापासूनचा डीए वाढवला आहे. या कर्मचाऱ्यांना आता एक जुलै 2023 पासून 701.9 % या दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
हा लाभ या संबंधित कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत दिला जाणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. निश्चितच या संबंधित कर्मचाऱ्यांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.