Government Employee News : पुढल्या महिन्यात गणेशोत्सवाचा पर्व सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची धूम महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे. यंदाचा गणेशोत्सव मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहणार असा दावा केला जात आहे.
कारण की सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून विशेषतः एआयसपीआयची आकडेवारी समोर आल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार असा दावा केला जात आहे.
म्हणजे जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात आणखी तीन टक्के वाढ होणार आहे. सध्या या लोकांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता म्हणजेच डीए दिला जात आहे. यामध्ये तीन टक्के वाढ होईल असे सांगितले जात असून हा डीए 45 टक्के एवढा होणार आहे.
मात्र डीए तीन टक्के वाढणार नसून डीए मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या या लोकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. डीए तीन टक्के वाढणार की 4% वाढणार याबाबत कन्फ्युजन आहे.
परंतु काही मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी महिन्यापासून ज्याप्रमाणे चार टक्के डीए वाढ लागू करण्यात आली होती त्याचप्रमाणे जुलै महिन्यापासून देखील चार टक्के वाढ लागू होणार आहे. याचाच अर्थ जर सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढ लागू झाली तर त्यांचा DA 46% एवढा होणार आहे.
दरम्यान याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही परंतु एका मीडिया रिपोर्टमध्ये सरकारी नोकरदारांचा DA हा चार टक्के एवढाच वाढणार असे सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सरकारी नोकरदारांचा DA चार टक्के एवढा वाढेल हे गृहीत धरून एवढी वाढ झाल्यानंतर त्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढणार पगार?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18 हजार रुपये असेल तर त्याला 46% प्रमाणे 8280 प्रति महिना एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. त्याला सध्याच्या 42% प्रमाणे रु.7560 प्रति महिना एवढा डीए मिळत आहे.
याचाच अर्थ किमान 18 हजार रुपये मूळ पगार असलेल्या लोकांना 8280 -7560 = 720 रुपये प्रति महिना एवढी महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. यानुसार त्याच्या वार्षिक पगारात 720X12 = 8640 रुपये एवढी वाढ सुनिश्चित होणार आहे.