Government Employee News : देशभरातील केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी आणि कौटुंबिक निवृत्तवेतन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर संपूर्ण देशभरात एक करोड पेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक तसेच निवृत्तीवेतनधारक आहेत.
या करोडो कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नुकतीच एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै महिन्यापासून चार टक्के एवढी वाढ होईल असा दावा केला जात होता.
मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एवढी वाढ होणार नसल्याचा दावा ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनच्या महासचिवांनी केला आहे. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ताबाबत म्हणजे DA बाबत महत्वाची माहिती दिली आहे.
मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे, जून 2023 साठी CPI-IW ची आकडेवारी नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी 31 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झाली असून यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ अपेक्षित आहे. दरम्यान ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनच्या माध्यमातून देखील शासनाकडे कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
मिश्रा यांनी आम्ही महागाई भत्त्यात चार टक्के वाढ व्हावी अशी मागणी केल्याचे सांगितले आहे, पण केंद्र सरकार महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करणार नसून तीन टक्क्यांनी वाढ करू शकते, असा अंदाज त्यांनी बांधला आहे. जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै महिन्यापासून तीन टक्के वाढ झाली तर मात्र कर्मचाऱ्यांना 45 टक्के DA चा लाभ मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मिश्रा यांनी सांगितले की, आता अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग महसुली परिणामांसह डीए वाढवण्याचा प्रस्ताव तयार करेल आणि तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवणार आहे. मग केंद्रीय मंत्रिमंडळाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मग प्रत्यक्षात ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी लागू केली जाईल. तसेच ही वाढ १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहे. याचाच अर्थ जुलैपासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधित कर्मचाऱ्यांना वर्ग केली जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या संपूर्ण देशभरात कार्यरत असलेल्या एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ४२ टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ दिला जात आहे. त्यात आता तीन टक्के वाढ सरकारच्या माध्यमातून दिली जाणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA आता 42 टक्के एवढा होईल असं चित्र आहे.