Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा आहे. या चालू वर्षात अर्थातच 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे.
यंदा या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच 2022 मध्ये हा महागाई भत्ता 38 टक्के एवढा होता.
यानंतर जानेवारी 2023 पासून हा महागाई भत्ता ४२ टक्के झाला यानंतर जुलै महिन्यापासून यामध्ये आणखी चार टक्के वाढ झाली आणि हा भत्ता 46 टक्क्यांवर पोहोचला आहे.
अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता महागाई भत्ता वाढीचा ट्रेंड बदलणार आहे.
येणारे नवीन वर्ष अर्थातच 2024 हे वर्षे निवडणुकांच वर्ष राहणार असल्याने पुढील वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्तामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होणार आहे.
किती वाढणार DA
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष 2024 मध्ये पहिल्या सहामाहीत महागाई भत्ता तब्बल पाच टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या महागाई भत्ता 46 टक्के एवढा आहे. यामध्ये आणखी पाच टक्के वाढ होणार आहे.
म्हणजेच महागाई भत्ता हा 51% वर जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास DA मध्ये ५ टक्क्यांची मोठी वाढ होणार आहे.
महागाई भत्ता केवळ AICPI निर्देशांकावरून मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते.
या आकडेवारीनुसारच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरत असतो. याच आकडेवारीनुसार तज्ञ लोकांनी जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढेल असा अंदाज बांधला आहे.