Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच मोलाची आणि महत्त्वाची राहणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासन लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे.
या निर्णयानुसार देशातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावानुसार सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी शासकीय सेवेतील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 2021 मध्ये वाढवण्यात आले होते आणि त्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनी शासनाकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार
खरंतर, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय देखील 60 वर्षे एवढेच आहे. पण आता या सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षांनी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर आली आहे.
याचाच अर्थ सरकारने जर हा निर्णय घेतला तर बँक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षांवरून 62 वर्षे होणार आहे. यासोबतच, सर्व बँक व्यवस्थापक संचालकांच्या निवृत्तीचे वय एक ते दोन वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, वित्त मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे पर्यंत वाढवण्यासाठी सरकार विचार करत असल्याचे सांगितले आहे.
सध्या या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनचे अर्थातच अध्यक्षांचे सेवानिवृत्तीचे वय 63 वर्ष एवढे आहे मात्र यामध्ये 2 वर्षाची वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. तसेच एलआयसी अर्थातच भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या 62 वर्षे एवढे आहे, यात आणखी 3 वर्षांची वाढ केली जाणार असून सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे केले जाऊ शकते.